पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. चांगदेवशिष्य- तर मग येथे ज्ञानेश्वर कोठे राहतो ? त्याचा मठ कोणता ? हे आह्मांला सांगा बरें ! एक मुलगी-( कानांवर हात ठेवून ) अरे मेल्या, तुझ्या वृत्तीवरून तर तू चांगला सिद्ध दिसतोस ! नी असं असून मेल्या, भीड, मर्यादा, नम्रता, ही सारी एकीकडे गुंडाळून ठेवून, उद्धटपणाने जगद्गुरूंचं एकेरी नांव घेऊन त्यांचा मठ विचारतोस, तेव्हां मेल्या, सिद्धाई शिकून त्याचा काय उपयोग केलास ? नी बाबा, कोणत्या गुरूच्या उपदेशाने हा अहंभावाचा ताठा तुझ्या अंगांत शिरला, ते सांग पाहूं ? अरे निर्लज्जा, जी केवळ परब्रह्ममूर्ति, त्या परब्रह्माबद्दल धिक्कारयुक्त वाणीने. तू आह्मांला पुसतोस ! तेव्हां मेल्या धिक् धिकू विकू तुझे जिणें ! ज्या जमद्ररूंचा झेंडा तिहीं लोकीं फडकत आहे, ते जगद्गुरु तुझ्या दृष्टीसमोर असून, तुझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या नसतांही, जेव्हा तुला दिसत नाहीत, तेव्हां तूं पूर्ण हतभागी नी घोरपापी आहेस हेच खरं ! चांगदेवशिष्य-( खजील होऊन व त्या मुलीपुढे साष्टांग नम. स्कार घालून ) मातोश्री, मी मूढ, अज्ञानी, महापापी आहे ! आणि त्यामुळे मला नेत्र असूनही मी अंध झालो आहे ! मला मामा करा आणि जगद्गुरूंचे दर्शन मला एकवेळ तरी करवा ! म्हणजे त्यांच्या दर्शनाने माझे जडबुद्धत्व नष्ट होऊन मला ज्ञानचक्ष प्राप्त होतील! आणि त्यांचा आशीर्वाद प्रसाद मागून मी आपल्या देहाचे सार्थक करून घेईन ! एक मुलगी-असा शुद्धीवर येऊन विचारशील तर ते पाहा जगद्गुरु तेथे बसले आहेत ! त्यांच्यापुढे दंडवत घालून हत अपराधांची नाक घासून क्षमा माग, नी जन्ममरणाच्या फे-यांतून मुक्त हो ! ( निघून जाते. ) | चांगदेवशिष्य- ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहतो. ) ज्ञानेश्वर-( समोर उभे असलेल्या लोकांस उद्देशून ) महाराज, जरा दूर व्हा. महासिद्ध चांगदेवमुनींच्या या शिष्यांना मला