पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. अहंतेनें दंभाचार वाढवून, देहाचे व्यर्थ मातेरें केलें आहे ! गुरुकृपेनें आत्मविचारवोध झाला नाही, तर त्या लौकिकाचा काय उपयोग ? | ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, सिद्धीचा आंगीं ताठा भरून सिद्ध चांगदेव अंतर्बाह्य अहंकारानें वेटून गेल्यामुळे ब्रह्मज्ञानाची कळा या चौदाशे वर्षांत त्यांच्या अंतर्दृष्टीस आजपावेतों पडली नाहीं ! आणि त्यामुळे जसा फळावांचून वृक्ष, किंवा पाण्यावांचून सरोवर, किंवा वैराग्यावांचून संन्यास, किंवा पर्जन्यावांचून जसे अभ्रपटल, किंवा राजावांचून जशी सेना, किंवा दृष्टीवांचून जसे नेत्र, किंवा प्राणावांचून जसे शरीर, त्याप्रमाणे चांगदेव सिद्धांच्या सर्व सिद्धि एका आत्मज्ञानावांचून व्यर्थ झाल्या आहेत ! चांगदेवशिष्य- सद्रुमहाराज, आपले भाषण यथार्थ आहे ! आणि हीच गोष्ट आमच्या स्वामींच्या लक्षांत सांप्रत आली असल्यामुळे ते सद्गुरुचरणदर्शनाविषयीं अत्यंत आतुर झाले आहेत ! ज्ञानेश्वर-हे सशिष्या, तू येथे येण्यापूर्वीच, माझ्या श्रीनिवत्तिनाथ सद्गुरूंनी अंतर्ज्ञानाने तुझ्या स्वामींबद्दल सर्व वृत्तांत मला सांगितला असून, तू स्वामींचे हे कोरे पत्र घेऊन आलास, यणजे तुझ्या हातीं तुझ्या स्वामींना उत्तर पाठविण्याविषयी मला अनुज्ञा केली आहे ! श्रेष्ठहो, मला कागद, दौत, लेखणी, आणून द्या; म्हणजे श्रीनिवृत्तिनाथ सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी मुनिश्रेष्ठ चांगदेवांना उत्तर लिहून पाठवितों. ( एक ब्राह्मण कागद, दौत, लेखणी आणून देतो; तेव्हां श्रीज्ञानेश्वरमहाराज खालील ओव्या कागदावर लिहितात. ) । श्रीगुरुभ्योनमः ॥ स्वस्ति श्रीवटेशु ॥ जो लपोनि जगदाभासु ॥ दावी मग ग्रासु ॥ प्रगटला करी ॥ १ ॥ प्रगटे तंव तंव न दिसे ॥ लपे तंव तंव आभासे । प्रगट ना लपाला असे ॥ न खोमता जो ॥ २ ॥ बहु जंद जंव होये ॥ तंव तंव कांहींच न होये ॥ कांहीं नहोनि