पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टै? श्रीज्ञानेश्वरमहाराज. तु या उपाधि ।। ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादी ॥ घोळघोळू ॥ ५३॥ रुचातयाचेनि मिसें ।। रुचिते जेविज जैसे । कां दर्पणव्याजे दिसे ॥ देखते जेवि ॥ ५४॥ तैसी अप्रमेयें प्रमेये भरलीं ॥ मौनाची अक्षरे भली ॥ रचोनि गोष्टी केली । मेळियाच ॥५५॥ इयेचे करुनि व्याज ।। तु आपणयातें बुझ । दीप दीपपणे पाहे निज ॥ आपुलें जैसें ॥ ५६ ॥ तैसी केलिया गोठी ॥ तया उघडिजे दृष्टी ॥ आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥ जालया प्रळयीं एकार्णव ॥ अपार पाणियाची धांव ॥ गिळी आपुला उगव ॥ तैसें करी ।। ५८ ॥ ज्ञानदेव ह्मणे नामरूपें ॥ विण तुझे साच आहे आपणपें ॥ ते स्वानंदजीवन पे ।। सुखिया होई ॥ ५९ ॥ चांगया पुढतपुढती ॥ घरा आलिया ज्ञानसंपाते ॥ वेद्यवेदकत्वही अतिती ॥ पदीं बैसे ॥ ६० ॥ चांगदेवा तुझान व्याजें ॥ मांडलिया श्रीनिवृत्तिजें ॥ स्वानुभव रसाळ खाजे ॥ दिधलें लोभे ॥ ६१ ॥ एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे ॥ दोन्ही डोळस आरिसे ॥ परस्पर पाहतां कैसे ॥ मुकले भेदा ॥ ६२ ॥ तिये परि जो ईया॥ दर्पण करील ऑविया॥ तो आत्म एवढीया ॥ मिळेल सुखा ।। ६३ ।। नाहीं तेंचि काय नेणों असे ॥ दिसे तेच कैसे नेणो दिसे ॥ असे तेंचि नेणो आपैसे ॥ तें कीं होईजे ॥ ६४ ॥ निदे परौतै निदैजणें ॥ जागृति गिळोनि जागणे ॥ केले तैसे गुंफणे ।। ज्ञानदेवो ह्मणे ॥ ६५ ॥ ( पत्र लिहिणे झाल्यावर ते शिष्याचे हातांत देऊन ) हे सत्-शिष्या, तुझ्या स्वामींच्या पत्रास, हे माझे उत्तर नेऊन दे; आणि त्यांना माझे सप्रेम दंडवत सांगून, तोंडी असा निरोप सांग की, परब्रह्म चराचरी अखंड नांदत आहे ! त्या सच्चिदानंदाला स्वरूप नाहीं, आकार नाहीं, बर्ण नाही आणि लहानमोठा भावही नाहीं ! मात्र अविद्येच्या भ्रांतींत द्वैत भावानें, अज्ञानी