पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/25

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. मंबाजी-हे कोण बरें येत आहेत ? हे तर आमचे रामेश्वर महाराज वाघुलीकर. हे तर केवळ प्रतिसूर्यच आहेत. यांचे सहा शास्त्रांचे अध्ययन झालेले आहे - यावे, या महाराज, आपल्या आगमनाने या मंबाजींचें घर आज पवित्र झाले. रामेश्वर-आपले वर्तनच अगोदर गंगाजलाप्रमाणे शुद्ध आहे, त्यामुळे आपलें घर सर्वदां पवित्रच आहे. त्यांत आमच्या आगमनाने अधिक पवित्र ते काय होणार ? हे यतिमहाराज आप- . ल्यास भेटण्याकरितां आले आहेत. मंबाजी-(एकीकडे ) बरे झाले यांची आणखी सुंदराजीची गांठ पडली नाही. नाहीतर या मंबाजीबुवाला पोबाराच करावा लागला असता. बाकी मी काय, सांगून दिले असते आमच्या एक नातेवाईकांपैकीच आहे ह्मणून. ( उघड) रामेश्वर महाराज आपल्या योगाने तरी या परमहंसांचे दर्शन झाले. महाराजांचें वास्तव्य कोठे असते? रामेश्वर-हे तिकडे नाशीकपंचवटीकडे गंगातटाकी असतात. यांचे नांव सदानंद,-यांचें नांव नित्यानंद. उभयतांनी मोठी खडतर तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे शरीराची कांती किती तेजःपुंज आहे पण ! तुमच्या या गांवच्या तुकारामाचा लौकिक नाशकास यांचे कानावर गेला. त्याचे कीर्तन यांनी लोहोगांवीं ऐकिलें. तुकाराम जातीचा शूद्र असून ब्राह्मणांस उपदेश करतो की, कर्ममार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा आहे, त्याचे अवलंबन कराः भक्तीने ईश्वर लवकर पावतो. नामाचा महिमा अगाध आहे. नुसत्या नामाने हा भवसागर तरून जाल. आतां या कामांत कसबे पुणे येथील महाराजांचे गुरु सर न्यायाधीश जे दादोजी कोंडदेव त्यांच्याकडे यांना घेऊन जाऊन तुकारामास चांगले शासन करण्याचा माझा इरादा आहे. सदानंद-शूद्रलोकांनी आपला धर्म सोडून जर ते ब्राह्मणधर्म बुडवू लागले किंवा त्या धर्माची अवहेलना करूं लागले, तर