पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. शिवाजी-तुमच्या स्वामिभक्तींची खातरजमा आज नव्याने नाही. अनेक घोर प्रसंगी तुह्मी जीवाची तमा न धरितां तळहातावर शिरें घेऊन शवर तुटून पडलेले आहांत. दोन हजार पठाण कोणीकडे आणि तुझी दोघे कोणीकडे ! तुमचे जीव बळी देऊन हा शिवाजी पळून जाऊन मराठ्यांच्या नांवाला काळीमा आणील, हे स्वप्नांतसुद्धा आणू नका. मी आपल्या स्वतःच्या प्राणापेक्षा तुमचे प्राण-माझ्या प्रत्येक चाकराचे प्राण-माझ्या प्रजेचे प्राण लाख पटीने अधिक किंमतीचे समजतों, अशी मनांत खात्री ठेवा. (तुकारामाचे पायां पडून ) महाराज, आम्हांस जाण्याची आज्ञा असावी. माझ्याकरितां आपल्या जीवावर देवानें संकट आणू नये अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आपण पाहिजे असल्यास आमच्याबरोबर चलावें. प्रसंग फार कठीण आहे. (कांहीं पठाण व त्यांचे रिसालदार प्रवेश करितात.) - पहिला रिसालदार-यहि तुकारामका मकान है. ह्या सेकडो आदमी बैठे है. इस्मे शिवाजी जिसने बिजापूर पादशहाकी दौलत लूटके मानिंद पादशहाके दौलत्मनबनाहै वो कौंसा है मै क्या जाने. किलेदारका ये हुकुम् है के, शिवाजीकु बिलफेल कैद करना और फोरन हमारे तरफ ले आना. मगर इसमे शिवाजी कौंसा खुदा जाने. क्यं भाई ? तुमारी राय इसवक्त क्या हय् ? दुसरा रिसालदार-लाहोलवला ! खुदा जाने शिवाजी पाक मूरत् हय् या बत् सूरत हय्, लेकिन उस्ताद शरीफ ये ताजूबकीबात् हय् के चेहेरे एक सरीके मुजे नजर आते हय. ये क्या बला हय् ? ये शिवाजी क्या वो शिवाजी क्या वो शिवाजी ? अप सबकु कत्ल फरमाना. यहि मेरी राय हय. चलो समसेर हातमे लेके वैसाही हामला करेंगे. पहिला रिसालदार-सबूर. जरासा छैर जाव्. तुकाराम-कोण हा आकांत ! कोण घोर प्रसंग ! पांडुरंगा, तूं या जगांतून नाहीसा झालास काय ? तुझ्या भक्ताचे कीर्तन ऐक