[ २ ] पद ३ रें. चल सोड श्वानपण ऊठ भारता, राष्ट्रप्रगतीसाठीं ॥ध्रु॥ मतभेदाचे भूत गाहुनी आधीं टाकावे । तेहतीस कोटी एक- जुटीने कार्या लागावे ॥ १ ॥ आपापसांतील भांडणतंटे दूर ठेवी स्वराज्य प्राप्तीनंतर त्याची विल्हेवाट लावी ॥ २ ॥ नको माजवूं मतामतांतर पुरे शुष्क तंटा । तुझीच कृती ही तुला भोंबतें फिरवी वरवंदा ॥ ३ ॥ पक्ष मरूं दे भेद जळूं दे मी तूंपण विसरा । एकजुटीनें झुंज चालू द्या रिपुशीं द्या टकरा ॥४॥ एकीचें बल कसे विलक्षण जगभर दृष्टि पड़े । ह्याच चलाने प्रचल अरिला कैक चरिती खडे ॥५॥ आत्म- त्वाची गंगा सरिता अखंड वाहं दे। विकल्प किल्मिष खल- मल सारा धुवून जाउंदे ॥ ६ ॥ समशेर करी घे कर्तव्याची ढाल निश्चयाची | तुझे बांकडे करावया मग छाती न कोणाची ॥ ७ ॥ 5 थ पद ४ थें. ह्या नंदी बैलांच्या । ऐका लीला गमतीच्या ॥ ध्रु० ॥ बरसातीविण कधीं न होते वळवळ गांडुळांची || तद्वत सगळ्या सभा परिषदा दुर दुर दो दिवसाची ॥१॥ व्यास- पिठावर जोर जोरसे ठराव करिती पास लगेच त्याच्या विरुद्ध आचरण कृतीनें फाल्गुन मास ||२|| ठरावाची ह्या किती वाहिली आजवरी लाखोली । तरी म्हसोबा प्रसन्न नाहीं पूजा निष्फळ झाली || ३ || खानेक हन् लढनेवाला चांदभाई है मेरा | ह्या तत्त्वावर सर्व चळवळी कान .
पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही