पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३ ] याजतील बारा ॥ ४ ॥ आजकुणाचा पायपोस हा नाहीं कुणाच्या पायीं । कुणी कुणाला मोजून नाहीं घडी विस्क ळित होई ॥५॥ किती स्वयंभू झाले पुढारी दे० भ०. म्हण चुनौ घेत । एक न बेटा दृष्टीस पडतो खरा मायेचा पूत ॥६॥ मानपत्र वा हारतुऱ्यांचीं ओझीं ह्यांनीं वाहावीं । मऊ बिछान्यावरी लोळतां देशभक्ती मिरवावी ॥ ७ ॥ यावया देवपण घाव टाकीचे आधीं लागती खावे । हवे तुम्हांला स्वराज्य तर मग हाल कुणीं सोसावे ॥ ८॥ गप्पा टोकुनी बाद खेळुनी बांधव निंदा करुनी । काय मिळविले सांगा आजवरी ढोळे उघडा अजुनी ॥ ९ ॥ पद ५ वें. । हे निरंजना दयाघना गजवदना । संरक्षी बुडतांना दीन जना ॥ ध्रु० ॥ जनदास दास हा गेला । बंगाली छावा पडला । बोलवे न या कटु बोला। अंधेरी, ये नयना, बघ- वेना ॥१॥ कर्णासम त्यागी गमला। पार्थासम भारी झाला । कृष्णासम खेळे खेळा। हिंनाना, सहवेना, क्लेशाना ॥ २ ॥ भेटण्या बाल तिलकाला, सांगण्यास गुजगोष्टीला । पंखाविण उडुनी गेला । येईना, बाळ पुन्हा, चर्र मना ॥३॥ पांखरा भडकुनी जासी । लावुनि आंच हिंदासी । ठेवुनि चंचु- खुणेशीं । येई सुर्खे, उडतांना, गा गाना ॥४॥ बंगाल ओस हा पडला । पतीविण अशी का अबला । घुबडांचा मेळा जमला । धुं करती, ती नाना, धांव गणा ॥ ५ ॥ 1