पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७ ] बहु देव-भक्त झाले । हरि त्यां सबैच खेळे । खेळे पवित्र खेळा । जगिं हिंद देश झाला ॥ १० ॥ नामास संत राजी । बोधी सदा समाजीं । बहुनाम बोध झाला । जगिं हिंद देश झाला । ११ ।। ज्ञानेश्वरादि संत । झाले तसे अनंत । सत्यास सांगण्याला । जगिं हिंद देश झाला ॥ १२ ॥ तो एकनाथ धन्य । पितरांस घालि अन्न । सदैव दास झाला । जगिं हिंद देश झाला ॥ १३ ॥ दामाजि संत वीर । कोठार फोडणार | त्या देवदूत झाला । जगिं हिंद देश झाला ॥ १४ ॥ तो नामदेवराया । देवास त्या वळाया | लावोनि धन्य झाला । जार्गे हिंद देश झाला ॥ १५ ॥ ज्याची अंभगवाणी । तुकया अंभग गाणीं । अमोल याला । जगि हिंद देश झाला ॥ १६ ॥ 1 रसना रसाळ ज्याची । राम रमे सदाची | सांगे सुबोध याला । जागं हिंद देश झाला ॥ १७ ॥ हरि तो उभाच राही । वीटेवरी सदाही । बैकुंठ पंढरीला । जर्गि हिंद देश झाला ॥ १८ ॥ शिवराय जन्म घेई । देशास जीव वाही । करण्यास जागृतीला । जागें हिंद देश झाला ॥ १९ ॥ टिळकास जन्म देई | नवयूग तोोचे होई । चढवीत इभ्रतीला । जगिं हिंद देश झाला ॥ २० ॥ ऐसा स्वदेश माझा । त्यागून सर्व काजा | कविराय गात बसला । जर्गि हिंद देश झाला ॥ २१ ॥