[<] पद १२ वें. हा हिंददेश माझा | परतंत्र गाळीं रुतला ॥ ध्रु० ॥ ही वीररत्नमाता | ही आर्य पूर्वजांची । ज्या सूर्य चंद्र लाजे । देना अघोर याची ॥ १ ॥ काळाशी झुंजण्याला | सोडुनी वैरलीला । कां स्वाभिमान मेला । नामर्द दीन बनला ॥२॥ महाराष्ट्र शिवनराचा | शिवराय भूपतीचा | माध्यान्ह सूर्य जैसा । प्रताप हा यशाचा ॥ ३ ॥ त्या शूर पूर्वजाचे । हे आज नांव राखा । बा तीन्ही लोकीं तुमचा । गाजे अखंड डंका ॥ ४ ॥ या वीर माउलीचे फेडा ऋणाशीं कांहीं । मग माय देश माझा | म्हणण्या उभार बाही ॥५॥ 10 पद १३ वें. हा हुंडाच हुंडा चार हजारांचा घेणार । लग्न खर्च काढणार ॥ध्रु०॥ एमे बिएस झालों। डिग्री घेऊन बसलों । अर्ज खरडुं लागलों आतां मोठी नोकरी मज मिळणार ॥१॥ जवळ नाहीं दीडकी । नाहीं शेतवाडी । । नाहीं व्यापार तागडी । नाहीं इस्टेट माझे वरद्वार ॥ २ ॥ माझी कांती काळी । तनु काठी मोळी । चष्मा सदा डोळीं । माझें मिच वर्णन काय सांगणार ॥३॥ पाहिल्या दिडशे मुली। पास नाहीं झाली । ब्युटी पॅरिसवाली । असेल तिच्याशी लग्न मी करणार ॥४॥
पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही