पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ४-५-६ ] अश्वलब्राह्मण- -मृत्युमुक्ति–अतिमुक्ति. आदित्यप्राप्तीनें अहोरात्रीचें उल्लंघन करतां येते, त्याप्रमाणें चंद्रप्राप्तीनें पूर्वापर पक्षांचें उल्लंघन होतें. त्यांतं यजमानाचा प्राण (तो) वायु. तोच उद्गाता असें उद्गीथ ब्राह्मणांत समजलें, वाणीनेंच आणि प्राणानेंच त्यानें उद्गान केलें असा निश्चय केला, आणि असेंहि ह्मटलें कीं उदक या प्राणाचा देह आहे आणि ज्योतिरूप आहे; हा चंद्र आहे. प्राण, वायु, चंद्र हें एकच स्वरूप असल्यामुळे आणि चंद्रानें किंवा वायूनें उपसंहार केला असतां ( मृत्यु तरून जाण्याच्या कामी ) कांहीं भेद होणार नाहीं, असें मानून श्रुतीनें आधिदैवत वायुरूपानें उपसंहार केला आहे. आणखी चंद्राला वृद्धिक्षय प्राप्त होतात, ते वायूच्या कारणानें होतात; त्यावरून तिथिस्वरूप कालाचा उत्पादक जो चंद्र त्याचा उत्पादक वायु आहे. ह्मणून ( यजमानाला ) वायुरूप प्राप्त झालें झणजे तो तिथिरूप कालाच्या पलीकडे जाऊन मुक्त होतो हें स्पष्ट सिद्ध होतें. याच कारणाकरितां तिथिकाल चंद्रस्वरूप आहे अशी दृष्टि (तीच) मुक्ति व अतिमुक्ति होय, असें अन्य श्रुतींत (माध्यंदिन श्रुति) ह्मटलें आहे, व या काण्वश्रुतीत (उद्गाता व प्राण) या दोन्ही साधनांविषयीं तत्कारणस्वरूप वायूची दृष्टि ठेवणें मुक्ति व अतिमुक्ति होय असें झटले आहे, त्यावरून माध्यंदिन व काण्व या श्रुतीं- मध्यें विरोधं नाहीं. ऋचा ६ – याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (अश्वलाने) पुनः भाषण केलें. जें हैं अंत- रिक्ष आहे तें जणूं निराधार आहे. यजमान स्वर्गलोकांप्रत कोणत्या आधारानें जातो? (उत्तर.) ब्रह्मा-ऋत्विज, मन, चंद्र या (आधारा) नें जातो. मन हेंच यज्ञाचा ब्रह्माऋत्विज. त्याचें जें हैं। मन तो हा चंद्र, तो ब्रह्मा; तो मुक्ति; ती अतिमुक्ति. या प्रमाणें अतिमोक्षं. मग संपत्ति. १ - चन्द्रप्राप्तीनें तिथिरूप कालाचे उल्लंघन करता येतें व मुक्ति प्राप्त होते, असें माध्यन्दिन श्रुतींत म्हटले आहे. वरील ऋचा काण्व श्रुतीपैकी आहे. त्यांत वायुरूप प्राप्त झाल्याने पूर्वापरपक्षरूप कालाचें उल्लंघन होऊन मुक्ति व अतिमुक्ति मिळते, असें झटले आहे. ह्यावरून दोन्ही श्रुति परस्पर विरुद्ध होतात, तो विरोध दूर करण्याकरितां आचार्याचें ह्मणणें असें कीं त्यांत ह्मणजे काण्वश्रुतीत उद्गाता प्राणरूपी वायु आहे असे म्हटलें तें पुष्कळ विचारानें निश्चितहि केले आहे. प्राण व चन्द्र हे दोन्ही एकच आहेत, असें सप्तान्न श्रुतींत (१-५-१) निश्चित केले आहे. मन किंवा त्याची देवता चन्द्र व प्राण किंवा त्याची देवता वायु ह्रीं दोन्ही ब्रह्मच आहेत. त्यामुळे सदरील काण्व श्रुतींत वायु देवतेचा संग्रह करून उपसंहार केला आहे, आणि माध्यंदिन श्रुतींत चन्द्र देवतेचा संग्रह करून उपसंहार करितात, मिळून दोन्ही श्रुति योग्यच आहेत व त्यांत विरोध नाहीं. २ – “हास वृथ्योर्यतः कर्ता वायुश्चन्द्रमसस्ततः । वायुनैवोपसंहारः प्राणोद्द्वात्रोरयं कृतः ॥ " अर्थ – वायु हा चंद्राचा कर्ता व वृद्धिक्षयांचा कर्ता आहे, ह्मणून ह्या काण्व श्रुतींत प्राण व उद्गाता यांचा उपसंहार मुळांत वायु शब्द घालून केलेला आहे. पहा - सुरेश्वर वार्तिक पृ. ११४३. ३ - ज्यापासून अतिमोक्ष (अतिमुक्ति) मिळते, ते अतिमोक्ष इतर इंद्रियांची मुक्ति. पहा -भिताक्षरा. ४- अग्निहोत्रादिक लहान लहान यागांमध्ये मोठ्या कर्मीची व त्यांच्या फलांची इच्छा धरून लहान मोठी कर्मे तेथून सारखींच या दृष्टीनें कल्पना करणें ह्याला संपत्ति ( संपादणी ) किंवा संपत्कर्म झणतात. पहा - मिताक्षरा.