पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्तभाग ब्राह्मण. ग्रह व अतिग्रह ह्यांपासून अतिमुक्ति. अध्याय ३, ब्राह्मण २. ऋचा १ – मग त्याला ( याज्ञवल्क्याला ) आर्तभाग जारत्कारव ह्याने प्रश्न केला. याज्ञवल्क्या, अशी (हाक मारून) भाषण केलें. ग्रह किती आहेत व अतिग्रह किती आहेत ? ग्रह आठ आहेत; अतिग्रह आठ आहेत. जे ते आठ ग्रह व आठ अतिग्रह ते कोणते ? भाष्य - प्रस्तावना - ( या ब्राह्मणांतील ) कथेचा संबंध स्पष्टच आहे. ( मागील ब्राह्मणांत ) कालस्वरूप आणि कर्मस्वरूप मृत्यूपासून अंतिमुक्ति सांगितली; पण ज्या ( मृत्यू ) पासून अतिमुक्ति सांगितली तो हा मृत्यु कोण ? तो मृत्यु नैसर्गिक ( अनादिसिद्ध ) अज्ञानास- तिमूलक आध्यात्मिक ( शारीरिक ) व आधिभौतिक ( पांच भौतिक ) विषयांस व्यापून असणारा ग्रहस्वरूप व अतिव्र्हस्वरूप होय. अशा व्यक्त मृत्यूपासून अतिमुक्त झालेल्या ( पुरु- षाची) अग्नि, आदित्य इत्यादि स्वरूपें उद्गीथ प्रकरणांत सांगितलीं. अश्वलाचे प्रश्नावरून तत्सं- बंधी कांहीं विशेष गोष्ट सांगितली. ती ही ( अतिमुक्ति ) ज्ञानसहित कर्माचें फल होय. ही कर्मफलें व साधनभूत कर्मे एतद्विशिष्ट जो संसार त्यापासून मोक्ष साधावयाचा आहे, ह्मणून बंधनकारक मृत्यूचें स्वरूप ( श्रुति ) सांगत आहे. बद्धानें मोक्ष मिळवावा. अतिमुक्ताचें ह्मणून जें स्वरूप सांगितलें त्यांत देखील मृत्युरूप ग्रहातिप्रहांतून तो सुट- लेला नसतोच. आणि असें झटले आहे की " अशनायो ( क्षुधा ) च मृत्यु. " हाच मृत्यु व आदित्यांतील पुरुषाचे संबंधानें श्रुति ह्मणते “ एक मृत्यु बहुत स्वरूपाचा आहे. " ह्यावरून आत्मस्थितीला पोहोंचलेला मात्र मृत्यूच्या व्याप्तींतून अतिमुक्त असें (शेवटी ) सांगितलें आहे. ( सूत्रात्मा ह्मणजे हिरण्यगर्भ, या स्वरूपांत असला तरी ) तेथें ग्रह व अतिग्रह हीं मृत्यु- स्वरूप असत नाहीत असें नाहीं. ( त्या स्वरूपांत मन आहेच ); आणि त्या मनाचें स्वर्गलोक हें शरीर आहे; आणि आदित्य हा त्याचें जोतिरूप आहे. पुढे सांगेलं की " मन हा ग्रह आहे, १ -अज्ञान अनादिसिद्ध ब्रह्माबरोबर आहे असें आचार्याचे मत आहे. २ - ग्रह ह्मणजे परस्वाधीन करणारी किंवा धरणारी वस्तु. ३ - अतिग्रह झणजे अत्यंत परवश करणारी वस्तु. ४ - अश्वलाला उत्तर दिलें त्यांत वाणी हा अग्नि आहे असे आपण पाहूं लागलों ह्मणजे मुक्ति प्राप्त होते; आणि आपणच अग्नि आहों अशी भावना केली ह्मणजे अतिमुक्ति प्राप्त होते, व प्रत्येक इंद्रियाविषयी त्या त्या इंद्रियाच्या देवतेची भावना केली असतां आतमुक्ति प्राप्त होते ही विशेष गोष्ट. ५–बृह १-१-२. ६ – एको वै मृत्युर्बहवा. ७- पहा सातवी ऋचा.