पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भुज्युब्राह्मण. वायुसायुज्य - पारिक्षितमुक्ति. अध्याय ३, ब्राह्मण ३. meer ऋचा १ -- मग ह्याला ( याज्ञवल्क्याला ) भुज्यूनें प्रश्न केला. याज्ञवल्क्या, अशी हाक मारून भाषण केलें. आह्मी चरके मद्रदेशांत गेलो होतों; व कपिगोत्री पतंचल नांवा- च्या (ब्राह्मणाच्या) घरीं गेलो. त्याची कन्या गंधर्वानें झडपलेली होती. त्या (गंधर्वा) ला आह्मीं प्रश्न केला. तूं कोण आहेस ? तो बोलला, मी आंगिरस सुधन्वा आहे. त्याला जेव्हां भुवनांच्या शेवटच्या हद्दी विचारल्या तेव्हां त्याला ह्मटलें कीं पारिक्षित कोठें अस- तात ? पारिक्षित कोठें असतात हे तेव्हां कळलें. मी तुला विचारतों कीं, हे याज्ञवल्क्या, पारिक्षित कोठें असतात ? 3 प्रस्तावभाष्य –' मग ह्याला ( याज्ञवल्क्याला ) ( लाह्यायनी ) भुज्यूनें प्रश्न केला. ग्रहातिग्रहरूप ( मृत्युस्वरूपी) बंधन सांगितलें. ज्या सकारण ( कर्मप्रयुक्त ) बंधापासून सुटला तर मुक्त होतो, किंवा ज्यानें बद्ध असला ह्मणजे संसारांत पडतो, तो (बंधच) मृत्यु; आणि त्या- पासून मोक्ष होणें योग्य आहे. ज्याअर्थी (त्या) मृत्यूला मृत्यु आहे, आणि मुक्त झालेल्याला कोठें (अन्य लोकीं) जाणें नाहीं; त्याअर्थी सर्व नाश (होऊन ) नाम मात्र शिलक राहतें, आणि दिवा विझतो, त्याप्रमाणें ( मरणकाली मुक्त झालेला जीव जेथला तेथें राहतो ) असें ठरले. त्यांत ( पूर्वीच्या ब्राह्मणांत ) संसारांत पडणारे व मुक्त होणारे जीवांचा ( पंचमहाभूतादि ) कारणांशी संबंध सारखाच असतांना, मुक्त पुन्हा देहेंद्रियें मुळींच घेत नाहींत; पण संसारांत पडलेल्या जीवांना पुन्हा पुन्हा देहेंद्रियें ज्या कारणानें प्राप्त होतात तें कर्म, अर्से विचारपूर्वक ठरविलें. आणि कर्मक्षय झाला ह्मणजे सर्व नाश होऊन मोक्ष ( प्राप्त होतो ) ; नाम मात्र शिलक राहतें; आणि तें कर्म पुण्यपाप नांवाचें (द्विविध ) आहे; कारण, पुण्यकर्मानें मनुष्य पुण्यवान् होतो, व पापकर्मानें पापी होतो असें ठरविलें. संसार ह्या कर्मामुळे ( पुण्यपापापासून ) उत्पन्न झा आहे. १ -- अभ्यासाकरितां फिरणारी मंडळी किंवा चरक शाखेची मंडळी. २ – मॉक्स मुल्लर साहेब ह्मणतात पारिरक्षित राजे होते, परंतु पारिक्षित राजांचा येथे संबंध दिसत नाहीं. ३ – भुज्यूनें ‘पारिक्षत कोठें असतात ?' असें तीनदां ह्मणण्याचें कारण एकदां गंधर्वाला कसें विचारलें तें बोलून दाखवलें; दुसऱ्यानें, गंधर्वाकडून उत्तर मिळून तें मी जाणत आहे, असें याज्ञवल्क्याला. दर्शविलें; तिसऱ्यानें, तोच प्रश्न याज्ञवल्क्याला विचारला..