पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १. ] भुज्युब्राह्मण - पारिक्षित मुक्ति. ( कर्मानें ) अज्ञान दूर होतें असें ह्मणाल तरी जुळत नाहीं; कारण ( ज्ञानाहून कर्म ) भिन्न स्वरूपाचें आहे. अज्ञान ह्मणजे अप्रकट असणें, ज्ञान ह्मणजे प्रकट असणें, या दोहोंचा विरोध आहे; पण कर्माचा आणि अज्ञानाचा विरोध आहे, असें नाहीं; त्यामुळे कर्म भिन्न स्वरूपाचें आहे. ज्ञानाभाव, संशय, किंवा विपर्यय, यांपैकी कोणतेही एक प्रकारचें अज्ञान असलें, तर तें सर्व ज्ञानानेंच दूर होतें, कर्मानें होत नाहीं; कारण ( कर्माचा ) कोणत्याही प्रकार - च्या अज्ञानाशीं विरोध नाहीं. आतां असें ह्मणाल कीं, कर्माचे अंगीं अज्ञान दूर करण्याची अदृष्ट शक्ति कल्पावी, (तरी जुळणार ) नाहीं. ज्ञानानें अज्ञानाची निवृत्ति होत असल्याचें दिसत आहे; तर ( कर्मानें होते अशी ) न दिसणारी निवृत्ति कल्पिणें योग्य नाहीं. साळी सडण्यानें जर त्यांचा कोंडा निघतो हैं स्पष्ट दिसत आहे; तर अग्निहोत्र वगैरे नित्य कर्माचें कार्यरूपानें कोंडा निघण्याला अदृष्ट कारण आहे, अशी कोणी कल्पना करणार नाही. त्याप्रमाणें अज्ञान दूर करणें देर्खाल नित्यकर्माचे न दिसणारें कार्य आहे, असें कल्पिणें योग्य नाही. ज्ञानाशीं कर्माचा विरोध आहे, असें आह्मी अनेक बेळां प्रतिपादन केलें आहे. कर्माशी ज्याचा विरोध नाहीं, असें ज्ञान घेतलें तर तें देवलोक- प्राप्तीला कारण होतें, असें श्रुतीनें झटलें आहे. “ विद्येनें देवलोकं " असें ( मागें ह्याच ) श्रुतींत ह्मटलें आहे. आणखी असें वेदविहित नित्यकर्माचें फल कल्पावयाचें आहे तर जें त्या कर्माशी विरुद्ध आहे, द्रव्य, गुण, कर्म ह्या पदार्थांपासून उत्पन्न होणारें नव्हे, व ज्यावर कर्माचें सामर्थ्य दिसत नाहीं, तें कल्पावें; किंवा जें कार्य करण्यास कर्माचें सामर्थ्य आहे, आणि जें फल कर्मास विरुद्ध नाहीं तें कल्पावें ? पुरुषांची प्रवृत्ति उत्पन्न होण्याकरितां नित्यकर्माचें फल कल्पिलेंच पाहिजे असें असेल तर कर्मसदृशफलकल्पनेकडे अर्थापत्तीचा विनियोग झाल्यामुळे नित्य असलेला मोक्ष त्यांचें फल कल्पिणें शक्य नाहीं, किंवा त्याला (मोक्षाला ) झांकणारे अज्ञानाची निवृत्ति (कल्पिणें योग्य ) नाहीं; कारण ( अज्ञानाला) कर्म विरुद्ध नाहीं, व हें दृष्टविषयक आहे. पारिशेष्यन्यायानें मोक्ष हेंच (नित्यकर्माचें फल ह्मणून ) कल्पना केली पाहिजे असें झ णाल-सर्व कंर्मीचीं (च स्वर्गपशुपुत्रादिक) सर्व फलें होत. इतर कर्मफलांच्या (स्वर्गादिकांच्या ) अभावीं ( नित्यकर्माचें मोक्षाहून ) दुसरें फल कल्पितां येणार नाहीं; आणि (अर्थात् ) मोक्ष शिलक राहतो, तोच (नित्यकर्माचें ) फल समजावें, असें वेदवेत्त्यांस इष्ट आहे; ह्मणून ( नित्य- कर्माचें फल ) मोक्ष कल्पावा असें ह्मणाल तर, ( तोही न्याय ) नाहीं. कर्माची फळें अनंत आहेत; ह्मणन पारिशेष्यन्याय लागू होत नाहीं. पुरुषांना इष्ट असणारी कर्मफलें अमुकच आहेत असें कोणत्याही अल्पज्ञ माणसाला निश्च यानें ह्मणतां येणार नाहीं; कारण पुरुषांच्या इच्छा किंवा फल प्राप्त करून घेण्याची साधनें, देश, काल, ह्या कारणांचा नियम नसतो; किंवा इच्छित फलाप्रमाणें इच्छा व साधनें बदलतात. आणि १-- उत्पत्ति, आप्ति, विकार, संस्कार, ह्रीं कार्ये उत्पन्न करण्याचें कर्मामध्ये सामर्थ्य आहे, हे दृष्ट झणजे सर्वोच्या पहाण्यांत आहे, ह्मणून कर्माचें सामर्थ्य त्यांहून निराळें जें अज्ञान तें दूर करण्याकडे चालत नाहीं. २. –बृ. १- ५ - १६.