पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ३ मद्र (मद्रास ) नावाचा देश आहे. त्या देशांत अध्ययन करण्याकरितां व्रताचरण कर- णारे ह्मणून, किंवा अध्वर्यु ( श्रौती ) ह्मणून, चरक-पर्यटन करीत होतों; ते आह्मी फिरत फिरत कपिगोत्री पतंचल नांवाच्या ऋषीच्या घरी गेलों. त्याची कन्या अमानुष (मानुष पिशाच वगैरे नव्हे ) अशा गंधर्वानें झडपलेली होती; किंवा तो गंधर्वविशेष विज्ञानी असल्याकारणानें ऋत्वि. जांची देवता गृह्याग्नि असावा असे घेतात; कारण साधारण पिशाचाला ( त्या कन्येनें दाख- वलें ) इतकें विज्ञान असण्याचा संभव नाहीं. (असो ), त्या ( कन्येच्या अंगांतील गंधर्वा ) ला आह्मीं सर्वांनीं, (दुसरें) निषेध करीत होते तरी विचारलें, तूं कोण आहेस ? - तुझें नांव काय आहे, व तुझें सामर्थ्य ( शहाणपण ) काय आहे? त्यानें उत्तर दिलें, मी आंगिरस गोत्रापैकी सु- धन्वा नांवाचा गंधर्व आहे. त्याला जेव्हां लोकांची शेवटची हद्द विचारली, तेव्हां त्याला आह्मीं ह्मणालों, ( एकंदर ) भुवनांच्या समुदायाचें परिमाण (लांबीरुंदी ) जाणावें, अशी सर्वोस इच्छा झाली; व आपली प्रतिष्ठाही कळावी ह्मणून आह्नीं त्याला प्रश्न केला. कसा तर, पारिक्षित कोठें आहेत ? आणि त्या गन्धर्वानें सगळे आह्मांस सांगितले. याप्रकारें माझें ज्ञान देवापासून आले आहे. तसें ज्ञान, हे याज्ञवल्क्या, तुला नाहीं, आतां तूं सांपडलास, असा भुज्यूच्या भाषणाचा अभिप्राय आहे. ( त्याचें ह्मणणें ) गंधर्वापासून माहिती मिळविलेला विद्यासंपन्न मी आहे, आणि मी तुला प्रश्न करितों आहें; तर पारिक्षित कोठें आहेत, हें जाणतोस काय ? याज्ञ- वल्क्या, सांग. मी विचारतो, पारिक्षित कोठें आहेत ? ३० ऋचा २ – तो ( याज्ञवल्क्य ) ह्मणाला, तो ( कन्येच्या अगांतील गंन्धर्व) असेंच ह्मणाला कीं, ज्या ठिकाणीं अश्वमेध याग करणारे जातात, त्या ठिकाणींच ते गेले. अश्व- मेध याग करणारे कोठें जातात ? तो लोक सूर्यरथाचे एक फेयाची जी लांबी होईल तिचे बत्तीसपट लांबीचे वर्तुळाइतका आहे. त्या लोकाभोंवतीं त्याच्या दुप्पट विस्ताराची पृथ्वी पसरली आहे. त्यापृथ्वीभोंवतीं तिच्या दुप्पट विस्ताराचा समुद्र फैलावला आहे. (त्याच्या व ब्रह्माण्डाच्या वरच्या शकलाच्या ) दरम्यान चाकूची धार जितकी बारीक असते किंवा माशीचा पंख जितका बारीक असतो तितकें (सूक्ष्म ) अंतर आहे. तेथें पारिक्षित ( अश्व- मेध याग करणारे ) ह्यांस इन्द्र पक्षिरूप धारण करून वायूच्या हवाली करतो. मग वायु त्यांस आपल्या स्वरूपांत घेऊन जेथें (पूर्वकाळचे ) अश्वमेधयाजी असतात, तेथे पोहोंच- वितो. ह्याप्रमाणें त्या ( कन्येच्या अंगांतील ) गन्धर्वानें वायूची प्रशंसा करून (पारक्षि- तांची गति सांगितली आहे. ) ह्यावरून वायु हा विविध ठिकाणीं व्यापून राहणारा ( व्यष्टि ) आहे. त्याप्रमाणेंच सर्वत्र जाणारा ( समष्टि ) आहे, ( आणि तो मृत्यूला जिंकितो. ) ज्या पुरुषाला असें ज्ञान असेल तोही मृत्यूला जिंकितो. इतकें ऐकून लाह्या- यनी भुज्यु स्तब्ध झाला. भाष्य - 'तो याज्ञवल्क्य ह्मणाला, असेंच (तो) ह्मणाला. ' ' असेंच' (वै ) हा शब्द (गंध, वीपासून मिळालेल्या ज्ञानाचें) स्मरण देण्याकरितां आहे. तो गन्धर्व तुला असेंच ह्मणाला