पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अं. ३ ब्रा. ४ तुझ्या आत्म्याची लक्षणें अमुक आहेत, ती प्रतिज्ञा संभाळूनच बोलत आहे. तें ( लक्षण) मी जसें सांगितलें तसेंच आहे. पण जें तूं ह्मणाला होतास की, तो आत्मा घटादिक पदार्थांप्रमाणे प्रत्यक्ष दाखव, तें अशक्य असल्यामुळे करितां येत नाहीं. पण तें अशक्य कां? असें ह्मणशील तर सांगतों कीं, त्या वस्तूचा स्वभावच असा आहे. त्या वस्तूचा स्वभाव कसा आहे ह्मणशील तर, दृष्टीचा द्रष्टपणा त्या वस्तूंत आहे. दृष्टि दोन तऱ्हेची असते. (एक ) लौकिकी दृष्टि, व एक पारमार्थिक दृष्टि होय. त्यांपैकीं लौकिकी दृष्टि ह्मणजे चक्षूंशी संयुक्त झालेल्या अंतःकरणाची वृत्ति. ती बनवावी लागते ह्मणून उत्पन्न होते, व नाश पावते; पण आत्म्याची जी दृष्टि आहे, ती अग्नीच्या उष्णता, प्रकाश वगैरे धर्माप्रमाणे द्रष्टा ( आत्मा ) याचें स्वरूप असल्यामुळे उत्पन्न होत नाहीं, व नष्ट होत नाहीं. ती आत्म्याची दृष्टि, चक्षुरिंद्रियाची उत्पन्न होणारी उपाधिरूप दृष्टि असते तिच्याशी संसृष्ट ह्मणजे जणूं मिश्रित अशी असल्याने तिला द्रष्टा असें ह्मणतात; व द्रष्टा निराळा व दृष्टि निराळी, असेही ह्मणण्यांत येतें. जी ही लौकिकी दृष्टि चक्षुर्द्वारा रूपविषयावर अनुरक्त होते, व उत्पन्न झाल्याबरोबर, नित्य जी आत्मदृष्टि तिच्याशी जणूं संसृष्ट होते, ती आत्मदृष्टाची पडछाया आहे व ती आत्मदृष्टीनें व्याप्तच असते. ती उत्पन्न होते व नाश पावते; त्यावरूनच द्रष्टा नेह- मींचा पाहणारा असून कधीं पाहतो, कधीं पाहत नाहीं, असें औपचारिक रीतीनें ह्मणतात; ( परंतु दृष्टीच्या द्रष्ट्याला उत्पत्ति व विनाश नाहीं ). द्रष्ट्याहून दृष्टीला निराळेपणा नाही, असे पुढें सहाव्या अध्यायांत सांगेल. " द्रष्टा जणूं ध्यान करीत असतो, जणूं चलनवलन करीत असतो ” अशी श्रुति आहे. “ द्रष्टयाच्या दृष्टीचा लोप होत नाहीं " अशीही श्रुति आहे. ( एकंदरीत याज्ञवल्क्य ) असा अर्थ सांगतो कीं, लौकिकी दृष्टिरूप विषयाचा जो द्रष्टा आहे; व जो स्वतःच्या नित्य दृष्टीनें लौकिकी दृष्टीला व्याप्त करतो, तो तुला दिसणार नाहीं. दर्शनक्रियेचें कर्म जे विषय, तद्रूप की दृष्टि रूपविषयावर अनुरक्त असून, रूप दाखवि- णारी आहे. तिला व्यापून असणाऱ्या प्रत्यगात्म्याला ती व्यापीत नाहीं; ह्मणून दृष्टीचा द्रष्टा जो प्रत्यगात्मा, तो तुला दिसणार नाही. त्याप्रमाणें श्रवणाचा श्रोता तुला ऐकू येणार नाहीं. तसाच मननाचा ह्मणजे केवळ मनोवृत्तीला व्यापून असणारा आत्मा त्याचें तुला मनन करितां येणार नाहीं. तसेंच केवळ बुद्धिवृत्ति में विज्ञान त्याला व्यापून राहणारा आत्मा, ह्याचें विज्ञान तुळा होणार नाही. हा वस्तूचा (आत्म्याचा ) स्वभाव आहे; ह्मणून ती वस्तु गाय वगैरेप्रमाणें दाखवितां येणार नाहीं. दृष्टीच्या द्रष्टयाला ( पाहता येणार ) नाहीं, वगैरे शब्दांचा कांहीं लोक निराळ्या तऱ्हेनें अर्थ करितात. ( तो असा ) "दृष्टीच्या द्रष्टयाला ह्मणजे दृष्टीच्या कर्त्याला ( अर्थात् ) यावत् दृष्टीच्या कर्त्याला आपली दृष्टि न बदलतां ( एतद्भिन्न दृष्टि न घेतां ) तूं पाहूं शकणार नाहींस." ' दृष्टीच्या ' ही कर्मवोधक षष्टी घ्यावी; कां तर, दृष्टि उत्पन्न केली, ह्मणजे ती, कुलाल घट उत्पन्न करितो त्याप्रमाणें, उत्पत्तिक्रियचें कर्म होते. द्रष्टृ शब्द 'तृ ' प्रत्यान्त आहे, त्यावरून द्रष्टा दृष्टि उत्पन्न करणारा असें ह्मणतात. एकंदरींत, दृष्टीचा द्रष्टा ह्मणजे दृष्टिकर्म करणारा कर्ता असा अर्थ होतो, असा त्या लोकांचा अभिप्राय आहे. १-' ध्यायतीव लेलायतवि बृ. ४-३-७. २-~' न हि द्रष्टुर्दृष्टेर्विपरिलोप: ' बृ. ४-३-२३.