पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसरे गार्गी ब्राह्मण प्रशास्तृ- अक्षर. अध्याय ३, ब्राह्मण ८. ऋचा १ -- मग वाचक्नवी बोलली कीं, पूज्य ब्राह्मणांनों, आपला रुकार असेल तर मी त्या याज्ञवल्क्याला दोन प्रश्न विचारीन. त्यांची उत्तरें तो मला देईल तर तुमच्यापैकी कोणीही कधींही त्या ब्रह्मप्रतिपादकाला जिंकण्याला समर्थ होणार नाहीं. ( इतरांनी उत्तर दिलें), गार्गी, विचार, भाष्य - ह्या नंतर अशनायादिकांपासून मुक्त असलेलें, उपाधिरहित, प्रत्यक्ष, व समक्ष सर्वांतर ब्रह्म ( अक्षर स्वरूप ) सांगावयाचें आहे, ह्मणून ( या ब्राह्मणाचा ) आरंभ आहे- 'मग वाचक्नवी बोलली '. याज्ञवल्क्यानें पूर्वी जिचा निषेध केला होता, व जी शिरःपातभयानें स्तब्ध झाली होती, ती पुनः प्रश्न करण्याविषयी ब्राह्मणांची परवानगी मागते. हे पूज्य ब्राह्मणांनो माझें भाषण ऐका. मी या याज्ञवल्क्याला, तुमची परवानगी असेल तर दोन प्रश्न विचारितें कही करून त्यांची उत्तरें तो मला देईल तर, तुमच्यापैकी कोणीही कधींही या ब्रह्मवादी याज्ञवल्क्याला जिंकील असें होणार नाही. याप्रमाणे भाषण केल्यावर 'गार्गी विचार' अशी ब्राह्मणांनी अनुज्ञा दिली. - ऋचा २ - - ती ह्मणाली, याज्ञवल्क्या, जसा काशी देशांतील किंवा विदेह देशांतील (राजाचा ) शूर पुत्र दोरी नसलेल्या धनुष्याला दोरी चढवून, ज्या बाणांनां (बांसाची टोकें ) लाविलेली असतात, असे शत्रुविघातक दोन ( बाणवंत ) बाण हातांत घेऊन अंगावर येतो, त्याप्रमाणें मी दोन प्रश्न घेऊन तुझे अग्रभागीं उभी आहे. ते दोन प्रश्न मला सांग. गार्गी, विचार. भाष्य – परवानगी मिळाल्यावर तिनें याज्ञवल्क्याला ह्मटले की मी तुला 'दोन प्रश्न विचारीन' हे मागील (ऋचेंतील शब्द ) घ्यावे. ते दोन प्रश्न कोणते, हें जाणण्याची इच्छा ( याज्ञवल्क्याला ) झाली आहे, असे पाहून त्या प्रश्नांची उत्तरें देणे कठीण आहे, हें (आगाऊ ) जाणविण्याकरितां, दृष्टांत देऊन ते प्रश्न विचारते. हे याज्ञवल्क्या, ज्याप्रमाणे लोकांमध्यें काशी देशांतील काश्य-( क्षत्रिय कुमारांचें ) शौर्य प्रसिद्ध आहे किंवा विदेह देशांतील राजाचा (कोणी) शूर पुत्र, ज्याची दोरी काढली आहे अशा धनुष्याला पुनः दोरी चढवून 'दोन बाणवत ' बाणश- ब्दानें बाणाच्या शेवटीं टोंक जोडतात ( तें समजावें); टोंक न जोडतांही शर होतो, ( तो नव्हे ), ह्मणून बाणवंत असें विशेषण दिलें आहे. 'दोन बाणवंत शर' यांचेंच शत्रुविघातक - शत्रूला ,