पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. ११-१२ ] प्रशास्तृ-अक्षर. अवस्थापक्ष आणि शक्तिपक्ष तर जुळत नाहीत; कारण अक्षर अशनायादिक संसार धर्माच्या पलीकडे असल्याबद्दल श्रुति आहे. अशनायादिकांच्या पलीकडे असणें, व अशना- यादिक धर्म ज्या अवस्थेला आहेत त्या अवस्थेत असणें ही दोन्ही एके वेळींच एका वस्तला असणे संभवत नाहीं. तसेंच शक्तियुक्तत्वही (अशनायाद्यतीत असल्यामुळे ) संभवत नाही. (अक्षराचे ) विकार किंवा अवयव आहेत असें ह्मणण्यावर आक्षेप येतात ते चवथ्यांत दाखविले आहेत ह्मणून ह्या सर्व कल्पना खोट्या आहेत. तर ( परमात्मा, क्षेत्रज्ञ, व अक्षर ) ह्यांमध्ये फरक कोणता ? फरक उपाधिमुळे होतो असें आह्मी ह्मणतों. त्याच्या स्वरूपांत फरक किंवा सारखेपणा मुळचा नाहीं; कारण मिठाच्या खड्याप्रमाणे एकसारखी चव (आनन्द ) देणाऱ्या स्वभावाचा तो ज्ञानाचा गोळा आहे. "ज्याला पूर्व (कारण) नाहीं, ज्याला पर (कार्य) नाहीं, ज्याला आंत नाहीं, ज्याला बाहेर नाहीं." आणि " हां आत्मा ब्रह्म ( आहे ) " अशी श्रुति आहे. आणि "बाहेरं व आंत सुद्धां असतो व अज आहे. " असें आथर्वणांत आहे, ह्मणून उपाधिरहित आत्म्याचें वर्णन करितां येत नसल्यामुळे, तो भेदरहित असल्यामुळे व एकरूप असल्यामुळे असा नव्हे, असा नव्हे असे सांगण्यांत येतें. त्या आत्म्याला अविद्या, इच्छा व कर्मे यांनी युक्त देहेंद्रियाची उपाधि जडली, ह्मणजे सं- सारी जीव ह्मणतात. नेहमी अत्यंत ज्ञानरूप शक्तीची उपाधि घेतली ह्मणजे आत्म्याला अंतर्यामी किंवा ईश्वर ह्मणतात. तोच उपाधिरहित स्वरूपानें केवळ शुद्ध असला ह्मणजे त्याला अक्षर किंवा पर ह्मणतात. तसेंच हिरण्यगर्भ, सूत्र, व्याकृत (विराट ) देवता, जाति (जल? ), पिण्ड ( पृथ्वी), मनुष्य, पशु, पिशाचें वगैरे देहेंद्रियरूप उपाधीनी युक्त त्या त्या नांवाचा, त्या त्या रूपाचा (आकाराचा) होतो. तसें (उपाधीनें भिन्नपणा येतो ही गोष्ट ) "तें कांपतें तें कांपत नाहीं " या ठिकाणीं वर्णिलें आहे, ह्यामुळे " हाँ तुझा आत्मा " " हां सर्वभूतांचा अंतरात्मा ” “ हाँ सर्व भूतामध्यें गूढ · ," " तें तूं आहेस ” “ मीचे हे सर्व " आत्मांच हे सर्व ' याहूने दुसरा पाहणारा नाहीं " वगैरे श्रुति परस्पर विरुद्ध नाहींत. इतर कल्पना ( भिणा अशा ) केल्या असतां ह्या श्रुतींचा मेळ बसत नाहीं; या कारणाकरितां उपाधिभेदामुळेच ह्यांचा भेद आहे, अन्यरीतीनें नाहीं; कांतर सर्व उपनिषदांमध्ये एकच द्वितीय रहित अक्षर आहे असें. निश्चयानें हाटलें आहे. "" 39 66 अध्याय ३ ब्राह्मण ८ समाप्त. १ – भिन्नभिन्नकाळीं भिन्नभिन्न शक्ति ब्रह्माला असतात अर्से ह्मण्टले तर तितक्या अवस्था असतात असें ह्मणणे येतें. २–' अपूर्वमनपर मनन्तरमबाह्यम्' । बृह. २-५-१९ 'अयमात्मा ब्रह्म' | ४-४-५. ३ ' सबाह्याभ्यन्तरोह्यज': । ( मुंड २ - १ - २ ) ४ 'तदेजति तन्नैजति' । (ईशा. ५) ५–' एष ते आत्मा ' बृह. (३–६–३) ६-' एष सर्वभूतान्तरात्मा १. (मुंड २-१-४) ७ – 'एष सर्वभूतेषु गूढः । (कठ ३-१२) सर्वम्'। (छां. ७ - २५ - १) ८ -- 'तत्वमसि' । (छा. ६-१२- १२ ) ९ – 'अहमेवेदं १० – 'आत्मवैवं सर्वम्' । (छां. ७ - २५ - २ ) ११ – 'नान्योऽतोऽस्ति द्रष्टा ( बृह. ३ - ७ - २३ )