पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ९ ऋचा २१ – ह्या दक्षिण दिशेला तूं आहेस; तुझी देवता कोणती ? (याज्ञवल्क्य ) - यम माझी देवता. ( शाकल्य ) - तो यम कोठें रहातो; (याज्ञवल्क्य) - यज्ञांत; ( शाकल्य ) - यज्ञ कशांत राहतो? (याज्ञवल्क्य ) - दक्षिणेत. शाकल्य दक्षिणा कशांत आहे; (याज्ञवल्क्य) - श्रद्धेत. श्रद्धा जेव्हां उप्तन्न होते, तेव्हां ( यजमान) दक्षिणा देतो, ह्मणून श्रद्धेत दक्षिणा राहते. (शाकल्य) श्रद्धा कशांत राहते? (याज्ञवल्क्य) हृदयांत; असे म्हणाला. हृदयानें श्रद्धा जाणतो, व हृदयांतच श्रद्धा स्थिर राहते. ( शाकल्य ) - होय, हें असेंच याज्ञवल्क्या. भाष्य - 'ह्या दक्षिण दिशेला तूं आहेस, त्या वेळीं तुझी देवता कोण ?' वगैरे पूर्वीप्रमाणे. दक्षिण दिशेला तुझी देवता कोणती ? माझी देवता यम असे उत्तर दिलें. दक्षिण दिशारूप मीं झालों असतां यम माझी देवता. तो यम कोठें राहतो ? असें विचारल्यावरून यज्ञांत असे उत्तर दिलें आहे. दक्षिण दिशेसहवर्तमान यम कारणरूप यज्ञामध्ये राहतो; पण यज्ञकारणापासून यमकार्य कसें होतें, ह्याविषयीं झटलें आहे कीं, ऋत्विक् यज्ञ उत्पन्न करितात, तो यज्ञ, यजमान त्यांस दक्षिणा देऊन, विकत घेतो. आणि त्या यज्ञाच्या बलानें यमासहवर्तमान दक्षिण दिशा जिंकितो. ह्यावरून यम यज्ञाचें कार्य असल्यामुळे, दक्षिण दिशेसहवर्तमान यज्ञांत राहतो, असें झटलें. यज्ञ कशांत राहतो? याचें उत्तर दक्षिणेंत. कां तर, दक्षिणा देऊन तो ( त्याचें पुण्य ) खरेदी करितो; ह्मणून यज्ञ हा दक्षिणेचें कार्य आहे. दक्षिणा कशांत राहते, असें विचारितां, श्रद्धेत, असे उत्तर दिलें. श्रद्धा ह्मणजे देण्याचा स्वभाव किंवा भक्तिसहित आस्ति- क्यबुद्धि. त्यांत दक्षिणा कशी राहते ? तर ज्याअर्थी जेव्हां श्रद्धा उत्पन्न होतें, तेव्हांच ( यज- मान ) दक्षिणा देतो; श्रद्धेच्या अभावीं दक्षिणा कोणी देत नाहीं; त्याअर्थी राहते असें ह्मटलें. आतां श्रद्धा कोठें राहतें ? या प्रश्नावर हृदयांत, असें उत्तर दिलें; कां तर, श्रद्धा हृदयाची वृत्ति आहे. ज्याअर्थी हृदयानें श्रद्धेचें ज्ञान होतें, आणि तद्रूप हृदयाची वृत्ति हृदयांतच राहते; त्याअर्थी हृदयांतच श्रद्धेचा वास आहे असें ह्मटलें. त्यानंतर ( शाकल्य ) राह्मणतो, होय असेच याज्ञवल्क्या. ऋचा २२ – या पश्चिम दिशेस तूं आहेस, त्या वेळीं तुझी देवता कोण? ( याज्ञव ल्क्य ) - वरुण माझी देवता. ( शाकल्य) - वरुण कोठें राहतो ? ( याज्ञवल्क्य ) - उदकांत. ( शाकल्य ) - उदक कोठें असतें ? ( याज्ञवल्क्य ) – रेतांत. (शाकल्य ) – रेत कोठें रहातें ? ( याज्ञवल्क्य ) हृदयांत. त्यावरूनच (आईवापा) सारखा झाला, असें ह्मणतात. जणूं हृदयांतून निसटला; जणूं हृदयांतून निर्माण झाला; कां तर हृदयांत रेत रहात असतें. हैं असेंच याज्ञवल्क्या. भाष्य – 'ह्या पश्चिम दिशेला आहेस तर तुझी देवता कोण ?' त्या दिशेला असतांना वरुण माझी देवता. तो वरुण कोठें राहतो तर, उदकांत; वरुण उदकांचें कार्य आहे. “श्रद्धा श्रद्धेतून वरुणाला उत्पन्न केला; ” अशी श्रुति आहे. उदक कशांत राहतें ? " तेंच उदक, " 66 २-' श्रध्दा वा आपः १ – आरस शब्दाचा हाच अर्थ आहे-उरांतून निघालेला. , ३ –' श्रध्दातो वरुणमसृजत.