पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६) श्री. नारायणराव पेशवे यांची बखर कारभारी पक्षाच्या हकीकती सु. वयास सर्व मुत्सद्दी गेले. तो पहिल्याने नाना भेटले. व बापूंची चिट्ठी सांपडली होती ती पाटीलबोवा यांचे स्वाधीन केली. ती चिठ्ठी वाचून पाहोन आपले पागो- टयांत ठेविली. मग हरीपंत तात्यांस व सर्व मुत्सद्दींस भेटले. व बापूंसही भेटले. अंबारीशी अंबारी भेटविली. आणि भेटी जहाल्या. मग पाटीलबावा यांनी चिठ्ठी पागोट्यांतून काढोन बापूंस दिली. मग बापू बोलले कीं, “ हीं अक्षरे माझी आहेत नानांस व हरीपंत तात्यांस धरावें" मग पाटीलबोवा बोलले कीं, "याचे पारिपत्य काय करावें ? " " आतां हे पुसणे काय ?" असे बापू बोलले. व पूर्वी बाराभाईची याँद जहाली त्याजवर सर्वांचे व माझा रुकार आहे. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. असे उत्तर बापूंनी केले. मग पाटीलबावांनी बापूंचे पायांत रुप्याची बेडी घा- तली आणि सिंहगडावर चढविले. मोरोबा दादा यांस नगरावर रवाना केले. याप्रमाणे बंदोबस्त केला व नाना फडणीस हे कारभार मुख्यत्वें करीत होते. त्यांस सोळा वर्षे एक छत्री राज्य सवाई माधव साहेब यांनी व राज्याचा कारभार ही एकछत्री नानांनी केला. फडणीस जे करतील तें मान्य. पुढे श्रीमंतांचे प्रताप करून पाटीलबोवांची मर्जी खुषी करून किताब दिला. व नवगत वस्त्रे देऊन शिक्के कटार व मोहोर श्रीमंतांनी दिल्हीं. याप्रमाणे श्रीमंतांचे प्रताप करून यशच मिळत गेले. पाटीलबावा हे मृत्यु पावल्यावर दौलतराव याचे कारकीर्दीत मोंगल शिकस्त करून मस्करी म्हणाल तरी श्रीमंतांची सोंगे वगैरे आणून वकीलांस दाखवून चलबिचल करीत होते त्यांचे ही पारपत्य होऊन पुण्यांत कैदेत ठेविला. मग श्रीमंत सवाई माधवराव साहेब हे उडी टाकून कैलासवासी जहाले. मशरूल मुलुख यास सोडून दिल्हें. अशी कथा जहाली. समाप्त. HLT १५. ' बारामाई' हा शब्द त्या काळा- | पासूनच प्रचारांत आला काय ?