पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर


कारभारी पक्षाच्या हकीगती सुद्धा.


___________

 श्रीगणेशायनमः । श्रीमंत कैलासवासी नारायणराव साहेब यांची हकीगत कशी काय जहाली, याचा मजकूर. श्रीमंत कैलासवासी थोरले माधवराव साहेब राज्य करीत असतां पुढे काही दिवसांनी त्यांची प्रकृति बिघडली म्हणून थेऊरचे गण- पतीस आराम होण्या करितां गेले. त्यांचे बराबर नारायणराव साहेब सर्व मुत्सद्दी तमाम सारे गेले होते. तेथे गेल्यावर प्रकृति अति अवस्था बिघडली, राजश्री सखाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस यांस बोलावून सांगितले की, या विकृतींतून पार पडतो असे दिसत नाही. त्यास श्रीमंत राजश्री दादासाहेब यांचा बंदोबस्त आम्ही आज पावेतों ठेविला होता. आतां आमचे पश्चात् कसा राहील ! त्यांत चिरंजीव राजश्री बाळासाहेब यांचा कारभार फारच भोळवट याजकरितां त्यांस लहानपणी नारायणराव साहेब म्हणत होते [ ? ] तो नेत्रांस पाणी आले. मग सखाराम बापू याणी विनंती केली की, आपण तिळप्राय चिंता न करावी. हे कर्मट प्रायश्चित [?] एतद्विषयी मनांत न आणावें. ईश्वर आपल्यास पार पाडील. कदाचित् तशी गोष्ट जहाली तर आम्ही चार मुत्सद्दी आहोत. सरकारचे आज्ञे प्रमाणे सर्व बंदोबस्त राख्खूं. श्रीमंत राजश्री नारायणराव साहेब यांजकडून राज्य असेच चालवूं.
 असे बोलल्यावर दोन चार रोजांनी रावसाहेब कैलासवासी जाल्याउपर बारा दिवस होऊन नंतर श्रीमंत राजश्री नारायणराव साहेब यांस सातायाहून वस्त्रे आली. [ त्या वरून ] श्रीमंत नारायणराव साहेब यांचे मनांत आपणच धणी [ असे आलें. ] सर्व मुत्सद्दी सुद्धां पुण्यास स्वारी आली. कारभार करूं लागले.त्यांजपाशी लहान पणापासून बाबाजी बर्वे या नामें होता तो मोठ्या कारभारांत नेमला. तो जे करील तें प्राधान्य. मुत्सद्दी यांचे नारायणराव साहेब यांचे. मनांत नी [ ? ] ऐकूं नये. श्रीमंतांची मर्जी बाबाजीवर पूर्ण. चार महिने बरा वाईट कारभार केला.मग सौ। आनंदी बाई साहेब यांस वैषम्य शल्य


  • हे प्रकरण आम्हांस कै. नारायण | कोठील, कोठें आहे व कोणी, केव्हां लि-

अनंत उकिडवे यांनी बडोद्याहून मूळ हिले व्याजबद्दल माहिती माहों. प्रतीचो नक्कल करून पाठविलें. अस्सल