पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(( १८० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- खंडेराव महाराज याण गोविंदराव रोडे यांजपासून पाहिल्याने इनाम दिलेला गाँव हिसकून घेतला, आणि त्याबद्दल गोविंदराव याची स्त्री हक्क सांगत आहे असें कर्नल फेर यांचे म्हणणे नेहेमीच्या सांप्रदायाप्रमाणें आहे. त्यांस कांही म्हणावयाचे असले म्हणजे त्यांस प्रमाणाची काही गरजच लागत नसे. गोविंदराव रोडे दिवाणगिरीच्या अधिकारावर असतांच त्याणी गांवाचा मोबदला करून घेतला होता. त्यांस माहित होते की, दहा हजारापेक्षां ज्यास्त उत्पन्नाचा गांव आपल्या पाठीमागे आपल्या वंशजाक- डेस चालणार नाहीं. स्वतः गोविंदराव याणी गांवाचा मोबदला करून घेतला असतां त्यांची स्त्री त्याबद्दल हक्क सांगण्यास कर्नल फेर यांजकडे. कधीं गेली होती, व तीस कसा हक्क सांगता आला हें खरें मानण्यास आपल्यास कांही आधार सांपडत नाहीं. कोहेना गांवाबद्दल कर्नल फेर असें ह्मणाले की, पालखीच्या नेमणुकींत हा गांव दिला होता, आणि. पालखीची नेमणूक रुपये ११०० पेक्षां ज्यास्त नसते म्हणून त्या रकमेपेक्षां गांवाचे ज्यास्त उत्पन्न सरकारांत भरण्याविषयीं गणेशपंत कामावर येण्यापूर्वीच हुकूम झाला होता, परंतु लबाडी करून ती रक्कम सरकारांत भरण्यास टाळाटाळी केली हैं गणेशपंत याणी वीस वर्षांनी उघडकीस आणून रुपये घेतले, 1 कर्नल फेरच्या या निवारणोपायांत देखील कांहीं विशेष अर्थ नाहीं. कोहेना गांवा- बद्दल जी सनद करून दिली होती त्यांत तर गांव चालू उत्पन्नाचा आंकडा देखील मुळींच लिहिला नव्हता, " पालखीच्या नेमणुकींत गांव दिला आहे " असे शब्द होते. असें असतां ज्यास्त उत्पन्न सरकारांत घेतलें, आणि इंग्रेज सरकारच्या जामिनकीच्या बळावर त्या दरकदाराने हिंदुस्थान सरकारापर्यंत फिर्यादी केल्या, परंतु काही चाललें नाहीं. सनद तयार करणें हें गणेशपंत भाऊ यांच्या हातांत होतें, आणि त्यांचे वजन मोठे होते यामुळे त्याणी तयार केलेल्या मसुद्यांतील एक अक्षरही कोणी कमी करील अशी कोणाची प्राज्ञा नव्हती. हक्काने जे कांही मिळावयाचे त्यापेक्षां ज्यास्त लोभ केला आणि वाजवीपेक्षां फाजील शहाणपण केले म्हणजे हासकाळांत ते प्रतिकूळ व्हावयाचेंच, ..गणेशपंत भाऊ यांच्या सनदेत वाजवीपेक्षां पुष्कळ फाजील मजकूर आहे, राव- र्टच्या रिसाल्याबद्दल इंग्रेज सरकारानी तीन लाख रुपये गायकवाड सरकारास माफ केले. हे फक्त गणेशपंत यांच्या साधनामुळे घडले, व त्याणी राज्याला कर्ज होते म्हणून दिवाणगिरीबद्दल साठ हजार रुपयांची नेमणूक घेण्यास नाकबूल केले अशी कांहीं वाक्ये आहेत. तुमचा कोणी मत्सर करील तर सनदेत लिहिलेल्या शर्तीप्रमाणे तुमच्याकडे गांव चालावा यासाठी तुम्हास रेसिडेंट साहेब यांची खात्री दिली आहे असाही सनदेत मजकूर आहे. मिळून जितकी बळकटी करवेल तितकी केली आहे, परंतु ती सर्व व्यर्थ जाऊन आज गणेशपंत भाऊ यांच्या संततीस त्या लेखाचा कांही देखील फायदा होत नाही. या मोकदम्याच्या संबंधाने एक गोष्ट मात्र मोठी महत्वाची आणि फिर्यादीच्या हक्कास पूर्णपणे बळकटी आणणारी घडून आली आहे.