पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. व पाहिजे तो अंक लिहावा, आणि त्याबद्दल त्याने कांही तक्रार केली तर लागलीच त्यास एका खोलीत कोडण्याचा हुकूम करावा. धनिक गुजराथ्यांची शेंकडो तरुण मुले व्यभिचाराच्या खऱ्या अथवा खोटया आरोपांत आणून कोतवाल दंडित असत, मुद्यावर धरून बायकांच्या आंगावरचे दागिने उतरून घेत असत. काजळीची अष्टमीची रात्र, हा तर कोतवालाचा मोठा मिळकतीचा दिवस. श्रावण वद्य ८ स काजळीची अष्टमी ह्मणतात. या दिवशी रात्रीं गुजराथी लोकांच्या बायका स्वच्छंदपणे देवदर्शनाकरितां फिरतात, त्यामध्ये ज्यांचा दुष्ट हेतु पूर्ण करण्याचा संकेत झालेला असे त्यांजवर कोत- वाल याचे फावत होतें. कोतवालाचे हेर गुप्तपणे फिरत असत, आणि एका रात्रीत बराच पैसा जमा होत असे. कोतवालाचा दक्षणी लोकांवर मात्र त्याबद्दल अंमल चालत से; कारण एक तर मराठी राज्य तेव्हां दरबारांत त्यांचा कोणी तरी कैवारी असावयाचाच; आणि त्यांत एकाद्या दांडग्या निर्लज्य मनुष्याने ती स्त्री मी पुष्कळ वर्षांपासून ठेविली आहे, त्यांत तुझ्या बापाचें आम्ही काय लागतो म्हणून म्हटले म्हणजे खुंटला कोत- वालाचा इलाज; आणि त्या निर्लज्यास ज्ञातिदंडाचे तर भय कसचें !! सयाजीराव महाराज यांचे कारकीर्दीच्या प्रारंभी सगळ्या बडोदें शहरांत काय ती एकच दिवाणी अदालत होती. ही अदालत आनंदराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बडोद्याचा राज्यकारभार रेसिडेन्सींत चालत होता त्या वेळेस स्थापित केली होती. त्या पूर्वी दिवाणीचे काम पंचांच्या द्वारे व्हावयाचे. सरकारांनी फक्त चतुर्थांश घेण्याकरितां दाखला मात्र ठेवावयाचा. महालांत देखील देण्या घेण्याच्या फिर्यादींचा निकाल पंचांच्या विद्य- मानेच होत असे, आणि त्याबद्दल नियमाची एक कलमबंदीही केली होती. . दिवाणी अदालतीच्या फैसल्यावर अपील ऐकण्यासाठी देवघर कचेरी म्हणून एक लहानशी अदालत होती, त्यांत दोनच कारकून असत. जेथें दिवसा दिवा लाविल्यावां- चून दिसावयाचें नाहीं ती देवघराची खोली त्या कोर्टाच्या कचेरीची जागा, आणि ह्मणूनच त्यास देवघर कचेरी म्हणत असत. दिवाणी अदालतीच्या फैसल्यावर पाहिजे त्याने अपील करावे अशी मोकळीक नव्हती. अपील करणारास खोटा पडलो तर अमुक दंड देईन' अशी कबुलात लिहून देऊन त्याबद्दल जामीन द्यावा लागत असे, त्यामुळे दिवाणी अदालतींतून अगर्दी अन्याय झाल्यावांचून अपील करण्यास सहसा कोणी धजत नसे. · कोतवाल यांच्या अधिकाराबाहेरचे गुन्ह्यांचा तपास देखील दिवाणी अदालतीत व्हाव- याचा, त्यासाठी निराळी योजना कांही एक नव्हती. सयाजीराव महाराज यांच्या कार- किर्दीच्या अखेरीस सदर न्यायाधिशी स्थापन झाली, व गणपतराव महाराज यांच्या अमलांत दरकदार कोर्ट स्थापन होऊन दुसऱ्याही लहान लहान अदालती स्थापित झाल्या होत्या, परंतु मुलुखामधील व्यवस्थेत कांहीं कमीज्यास्त झाले नव्हते. शहरच्या पोलिसाचा अधिकार सयाजीराव महाराज यांचे शालक रघुनाथराव धायभर ऊर्फ बाबासाहेब किल्लेदार यांजकडे होता. त्यांच्या कामदारांनी रयतेवर पाहिजेल तसा जुलूम केला तरी त्याजबद्दल दाद लागण्यास मुळींच मार्ग नव्हता; कारण धायभर यांचे