पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें माषण. (२४१ ) र्यादीतर्फेने या प्रकरणांत शिरवला आहे; परंतु त्याला या गुन्ह्यांत सामील करण्याची अगदीं गरज दिसत नाहीं. याजवरून मी ह्मणतों कीं, ही एक असंभाव्य व सृष्ठिकमाविरुद्ध गोष्ट आहे. असो, नरसूला या प्रकरणांत लोटला तर लोटला; कारण ह्याणें कांहींसा तरी प्रतिष्ठितपणाचा डौळ घातला आहे. तो केवळ प्रारब्धवादी बनून गेला आहे. व त्याला ईशकृपेनें पश्चाताप झाला असे तो सांगतो व जो हुआसो किस्मत से हुआ " असे बोलणारा तरी तो बनून गेला आहे. याप्रमाणे किती एक दुसरे साक्षीदार या मुकदम्यांत व्यर्थ घुसडून दिले आहेत. 66 चीफ जस्टिस महाराज, या मुकदम्याची हकीकत मी आपणास यथानुकमें सां. गण्याची उमेद बाळगित आहे व माझा जाब जेवढा संक्षिप्त व स्पष्ठ माझ्याने करवे. .ल तेवढा मी करीन; परंतु सामोग्री एवढी कुब्बल जमली आहे व हा चौकशी एवढी लांबट झाली आहे कीं, कदाचित माझ्या हातून अनुक्रम सुटेल व घोटाळा होईल व कांहीं मजकूर सांगणेही राहून जाईल व कांही चुक्या पण होतील तर त्याची आ. पण व कमिशनाच इतर मेंबर यांनीं दुरस्ती व पूर्ति करून घ्यावी अशी माझी विनंती आहे. हा मुकदमा फिर्यादीतर्फे ज्या रीतीनें आपणासमोर ठेवळा गेला आहे तिजविषयों काही बोलणे इष्ट दिसते. ह्मणून माझे विद्वान मित्र आडवोकेट जनरल मि० स्क्रोबल यांच्या आरंभीच्या भाषणासंबंधीं चार बोल बोलतों. जो मोठा हुद्दा त्यांजला मिळाला आहे त्याला सर्व रीतीनें साजेसेच ते भाषण आहे. तें रास्त व पूर्णपणे तांलीव आहे. त्यांत गायकवाडांच्या तर्फेने किंचितही दोष ला वण्याजोगा एकही शब्द नाहीं. सारांश या मोठ्या महत्वाच्या व काळजी उत्पन्न करणाऱ्या मुकदम्यांत आरंभापासून तो शेवटपर्यंत जेवढी बनेल तेवढी मजला माझे मित्रांकडून मदतच मिळत गेली आहे, व ते मजशी एक सारखे सौजन्यानेंच वाग त आले आहेत, ही एक या मुकदम्यांत सुखाची गोष्ट झाली आहे. त्यांनी जे भा ' षण केले ते फार खबरदारीने केले व त्यांना जी त्यांच्या वकिलाने माहिती दिली ती फार सावधागरीने दिली होती. म्हणून ज्या रीतीने हा मुकदमा आपणास त्यांना . समजाविला त्या रीतीविषयीं मी बोलतों, व या मुकदम्याच्या ज्या प्रकरणावरून गा.. यकवाडांस प्रतिकूळ आपण सुचविलें त्यावर आपण अभिप्राय द्यावा असें आपणास त्यांनीं लक्ष पोचवावे असे मी प्रार्थितों. त्या वगळली भाषणांत एक गोष्ट वगळली आहे. तो त्यांनी जाणून बुजूनच असावी-ह्मणजे ती गोष्ट त्यांना वगळणें भागच पडळें असावें असे मला वाटतें. तो ही कीं हा गुन्हा करण्यास गायकवाडांस हेतु काय हें त्यांनी आपल्या भाषणाच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत कोठेंच सुचविलें नाहीं, ह्मणून गायकवाडांची स्थीति कशी होती व त्यांची वर्तणूक कशी होती व त्यांचे हेतु काय होते हैं दाखवून देण्या- चे काम माझे माथीं आलें; ह्मणून मी ह्मणतों माझ्या मित्रांनीं पुष्कळ या गोष्टीचा विचार केला असेलच व असे असतांहीं कांहीं हेतु त्यांच्याने सुचविला गेला नाही;