पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशसहस्री. अथ मोक्षसाधनोपदेश विधि व्याख्यास्यामो मुमु- क्षूणां श्रदधानानामर्थिनामर्थाय ॥ १ ॥ - अर्थः - श्रीमत् शंकराचार्य म्हणतात:- जन्ममरणरूपीं परंपरा कोणच्या साधनानें सुटेल है आह्मी सविस्तर सांगणार आहों. याचे अधिकारी कोण ? ज्यांना मोक्षाची इच्छा झाली असेल, ह्या ग्रंथा- विषयीं विश्वास असेल, आणि ह्याचा अर्थ समजून घ्यावा असा हेतु असेल, अशा लोकांच्याकरितां आझी हा मार्ग सांगत आहों. • तदिदं मोक्षसाधनं ज्ञानं साधनसाध्यादनित्यात्सर्वस्मा- द्विरक्ताय त्यक्तपुवामैत्रलार्केषणाय प्रतिपन्न परमहंसपारित्रा- ज्याय शमदमदयादियुक्ताय शास्त्रप्रसिद्ध शिष्यगुणसंपन्नाय शुचये ब्राह्मणाय विधिवदुपसन्नाय शिष्याय जातिकर्मवृत्त- विद्याभिजनैः परीक्षिताय ब्रूयात् पुनः पुनः यावद्ग्रहणं दृढी भवति ॥ २ ॥ - - पा अर्थ :- तो मोक्ष मिळवून देणारें ज्ञान वारंवार सांगावें-तें पूर्ण- पणे ठसेपर्यंत सांगावें. कोणाला ? ( यज्ञयागादिक सांगितलेली ) साधनें आणि ( त्यापासून मिळणारे स्वर्ग वगैरे उपभोगाचे हीं ) साध्यें ही दोन्हींही अनित्य ह्मणजे नाशवंत आहेत, असे स. पदार्थ मजून त्याविषयीं ज्याला इच्छा राहिली नाहीं; घरदार, स्वर्ग वगैरे लोक ह्यांच्याविषयीं ओढा ज्याला उरला नाहीं; मुलेचाळे, द्रव्य,