पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) परमहंस होऊन सर्वोचा त्याग करण्याची ज्याची तयारी असेल; मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह करून सर्व भूतमात्रांविषयीं दया ज्याच्या ठिकाणी आली असेल; शास्त्रांत शिष्याच्या अंगी असले पाहिजेत ह्मणून सांगितलेले गुण ज्याच्या अंगी असतील; अंतर्बाह्य शुद्ध झालेला असेल; ब्राह्मणाच्या कुलांत जन्मलेला असेल; शास्त्रमार्गाप्र- माणें गुरूला शरण येईल; जात, ह्या जन्मांत त्यानं केलेली कर्में, त्याचें वर्तन, त्याची विद्या, कुलगोत्र वगैरे संबंधानें जो योग्य असेल, त्या शिष्यालाच हें ज्ञान द्यावें. - श्रुतिश्च - ' परीक्ष्य... तत्त्वतो ब्रह्मविद्यां' इति । दृढगृहीता हि विद्या आत्मनः श्रेयसे संतत्यै च भवति । विद्या संततिश्च प्राण्यनुग्रहाय भवति नौरिव नदीं तितीषः । शास्त्रंच - ' यद्य- व्यस्मा इमामद्भिः परिगृहीतां धनस्य पूर्णा दद्यादेतदेव ततो भूयः' इति । अन्यथा च ज्ञानप्राप्त्यभावात् ' आचार्यवान् पुरुषो वेद आचार्यादैव विद्या विदिता' 'आचार्यः प्रावयिता सम्यञ्ज्ञानं लव इहोच्यते' इत्यादिश्रुतिभ्यः, • उपदेक्ष्यति ते ज्ञानं' इत्यादि स्मृतेश्च ॥ ३ ॥ अर्थ:- वर सांगितल्याप्रमाणे तयारी असलेल्या शिष्याला गुरू- ने ब्रह्मविद्येचा उपदेश करावा, ह्याबद्दल मुण्डकोपनिषदांतील प्रथम मुण्डकांतील दुसऱ्या खंडांतील बारा आणि तेरा हे दोन श्लोक सां- गतात. वारंवार सांगून दृढ झालेल्या विद्येने ( संशय वगैरे नाहीं- से होऊन ) आत्म्याचें कल्याण होते आणि तशी विद्या दुसन्याला सांगतां येते. नदी उतरून जाण्याकरितां एक (चांगली) नाव ठेवली "ह्मणजे ती पाहिजे त्याच्या उपयोगी पडते, त्याप्रमाणे दुसऱ्याला सांगतां आलेली विद्या सगळ्यांच्या हिताला कारण होते. याचें