फल शास्त्रांत सांगितले आहे ते असे:- ही समुद्रानें वेष्टित पृथ्वी द्रव्यानें भरून दान केली तरी विद्यादानाची बरोबरी येणार नाहीं. गुरुशिवाय विद्या प्राप्त होण्याला मार्ग नाहीं. ह्याला आधार पुष्कळ श्रुती आहेत, त्यांपैकी तीन येथें दिल्या आहेत. गुरूकडे गेलेल्या पुरुषाला ज्ञान झालें; गुरूपासून प्राप्त झालेलीच विद्या कायम रहाते; गुरु नावाडी आहेत, उत्तमज्ञान ही नौका होय. ह्याला स्मृतीचा हि आधार आहे. तो श्रीमद्भगवद्गीतेतील ४ थ्या अध्यायाचा चौ- तिसावा श्लोक होय. गुरूला शरण जा, त्यांना शंका विचार, त्यांची सेवा कर ह्मणजे ते तुझ्यावर अनुग्रह करून तुला ज्ञान सांगतील. शिष्यस्य ज्ञानाग्रहणं च लिङ्गैर्चुध्वा अग्रहणे हेतून अधर्मलौकिक प्रमादनित्यानित्यावेवेक विषयासंजातदृढ पूर्वश्रुतत्व लोकचिंतावेक्षणजात्याद्याभमानादीन तत्प्रतिपक्षैः श्रुतिस्मृति- विहितै: अपनयेत् अक्रोधादिभिरहिंसादिभिश्व यमैः ज्ञाना- विरुद्धैश्च नियमैः ॥ ४ ॥ - - अर्थ:- एकदां ज्ञान सांगून तं शिष्याच्या मनांत ठसत नाहीं. तसे ते त्याला समजलें नाहीं हें त्याच्या मुखावरून, हावभावांवरू- न, बोलण्याचालण्यावरून ओळखावें. ज्ञान न समजण्याला कारणे असतात ती :- पूर्वजन्मींची पातकें, जन्मापासून केलेली दुष्टकृत्यें, शास्त्रनियमाचें उल्लंघन, जगांतील नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार न केल्यामुळे, जे कांही ऐकले असेल तें ध्यानांत ठे- वण्याची संवय नसल्यानें, लोक नांवें ठेवतील ह्याची भीति, कुल जाति वगैरेचा अभिमान; हे दोष घालविण्याकरितां त्याच्यावर श्रुतिस्मृतीत सांगितलेले उपाय करावे. सूर्याची सेवा, शास्त्राप्रमाणे भोजनाचे नियम पाळणे, वगैरे. शिवाय संताप, इच्छा वगैरे, ,
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/१७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही