पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) आणि अहिंसा, सत्य वगैरे व ज्ञानाच्या आड येणार नाहींत असले तीर्थयात्रा वगैरे यमनियम ह्या साधारण उपायांनीं ज्ञान दृढ हो प्याला विघ्न करणारे दोष घालवावे. T अमानित्यादिगुणं च ज्ञानोपायं सम्यग्ग्राहयेत् ॥ ५ ॥ त्याप्रमाणेच ज्ञान होण्याला उपाय अभिमान नसणे वगैरे गुण चांगले संपादन करावे. आचार्यस्तूहापोहग्रहणधारणशमदमदयानुग्रहादिसंपन्नो ल- ब्धागमो दृष्टादृष्टभोगेष्वनासक्तः त्यक्त सर्व कर्मसाधनो ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितोऽभिन्नवृत्तो दम्भदर्पकुहकशाठ्यमायामात्सर्यानृ हंकारममत्वादिदोषविवर्जितः केवलपरानुग्रहमयोजनो त्रि- द्योपयोगार्थी पूर्वमुपदिशेत् - - अर्थः - कोणच्या प्रकारचा गुरु असावा ते सांगतात. शिष्या- च्या मनांतले संशय ओळखणारा; त्याची भलती झालेली समजूत घालविणारा; त्याचे प्रश्न समजणारा; योग्य वेळेला ते प्रश्न आठ- विणारा; शम, दम, भूतदयां ह्यांनी युक्त असलेला; दुःखिताचा कळ• वळा करणारा; ( गुरूपासून ) विद्या शिकलेला; ह्या जगांतील किंवा स्वर्गातील भोगांविषयीं विटलेला; एकंदर कर्माची साधनें सोडलेला (संन्यास केलेला), ब्रह्मज्ञान झालेला; नेहमी स्वानंदांत दंग असलेला; शास्त्रमार्ग न सुटलेला; ढोंग, गर्व, कपट, दुष्टबुद्धि, लबाडी, मत्सर, खोटेपण, अभिमान, मोह वगैरे दोष नसलेला; दुसन्याच्या उपयो गीं पडण्याच्या हेतूनेंच केवळ जगांत रहाणारा; आपले ज्ञान दुसन्याच्या उपयोगी पडण्यासारखे करून देण्याची इच्छा धरणारा, अशा गुरूने प्रथम उपदेश करावा तो असाः -- - 6 सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् ' ' यत्र ना-