आचार्योब्रूयात् - साध्ववादीः सम्यक्पश्यसि । गुरु ह्मणतात: – हें बोललास है बरोबर, ह्यावरून तुझी नीट समज झाली आहे असे दिसते. कथं मृषा अवादीः ब्राह्मणपुत्रोऽदोन्चयो ब्रह्मचार्यासं गृहस्थोवा, इदानीमस्मि परमहंस परिवाडिति ॥ १३ ॥ अर्थ:-
- - पण मघाशीं तूं ह्मणत होतास कीं, मी ब्राह्मणकुळांत
अमक्याच्या पोटी जन्म घेतला, ब्रह्मचारी किंवा गृहस्थ आहे, पर महंस दीक्षा घेतलेला आहे, ते तसे खोटें कां बोललास ? -- यदि ब्रूयात्-भगवन् कथमहं मृषा अवादिषम् ॥ १४ ॥ शिष्याः -- महाराज, तें माझे बोलणे खोटें कसें ? तंप्रति ब्रूयादाचार्यः- यतस्त्वं भिन्नजात्यन्वयसंस्कारं शरीरं जात्यन्वयव जितस्यात्मनः प्रत्यभ्यज्ञासीः ब्राह्मणपुत्रोऽदोन्वय इत्यादिना वाक्येनेति ॥ १५ ॥ - गुरुः --जात, कुळ लागली कोणाला? मुंज वगैरे झाली कोणाची तुझी किंवा शरीराची ? जात, कुळ, संस्कार लागत नाहींत असा जो आत्मा त्याच्या ठिकाणी मी ब्राह्मणाचा मुलगा बैगैरे शब्दांनी त्या त्या गोष्टी तूं डकवून घेतल्याप्रमाणे बोललास तें खरें आहे कां ? स यदि पृच्छेत् - कथं भिन्नजात्यन्वयसंस्कारं शरीरं, वाऽहं जात्वन्वयसंस्कारवर्जितः इति । - शिष्यः - ते कसें ? निरनिराळ्या जाती, वंश, संस्कार शरीरा- लाच कशा लागतात, मी त्यापासून वेगळा कसा ? आचार्यो ब्रूयात् श्रुणु सोम्य यथेदं शरीरं त्वत्तो भिन्नं भिन्नजात्यन्वयसंस्कारं, त्वंच जात्यन्वयसंस्कारवर्जितः इत्यु- क्त्वा तं स्मारयेत् - स्मर्तुमर्हसि सोम्य परमात्मानं सर्वात्मानं