पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) वगैरे लक्षण लागू पडत नाहीत असा, सर्व पातकें नाहींशीं कर- णारा. संसारांतील कोणचाही धर्म ज्याला लागत नाहीं तो. जो प्रत्यक्ष आणि अपरोक्ष ब्रह्म. तोच आत्मा. सर्वांच्या अंतर्यामी रहाणारा. सर्वोस पहाणारा, पण त्याला कोणी पाहू शकत नाहीं. सर्व कांहीं त्याला ऐकू जाते पण श्रवणेंद्रियानीं त्याचें ज्ञान होत नाहीं. सर्वांच्या मनांतले विचार तो जाणतो, पण तो मनानें जाणला जात नाहीं. सर्वांचें ज्ञान त्याला आहे पण त्याचें ज्ञान कोणाला नाही. तो ज्ञानरूप नेहमी आहे. सर्वांच्या आंत भरलेला आहे, बाहेर आहे. विज्ञानाचा तो सांठाच आहे. आकाशाप्रमाणें सर्वत्र भरलेला आहे. त्याच्या सामर्थ्याला पारावार नाहीं. तो सर्वांचा आत्मा आहे. त्याला भूक वगैरे बाधा नाहीं. प्रगट होणे किंवा गुप्त होणें हीं त्याच्या ठिकाणी नाहीत. त्याचे सामर्थ्य असे विलक्षण आहे की तो आपल्या निव्वळ सत्तारूप स्फुरणानें नाम- रूपाकार जग दाखवितो. आत्म्याहून निराळें जग होण्याला उपादान कारण, परंतु आत्म्याच्या आधारावर रहाणारें, त्याच्याहून निराळे असून त्याच्याच आधारावर असल्यामुळे शब्दांनी ज्यांचे वर्णन होत नाहीं असें, त्याचें ज्ञान होण्याला इतराचा उपयोग नाहीं, अशीं जीं प्रकट नसलेलीं नामरूपें त्यांना तो प्रकट करतो. उत्पन्न ते नामरूपे अव्याकृते सती व्याक्रियमाणे तस्मादेतस्मा- दात्मनः आकाशनामाकृती संवृत्ते । - अर्थ:- ती प्रकट नसलेली नामरूपें ह्याप्रमाणे स्पष्ट दशेला आल्यानंतर ह्याच आत्म्यापासून आकाश हें नांव आणि त्याची आकृति झाली.