पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) भावं इत्येवं क्रमेणं पूर्वपूर्वानुमवेशेन पञ्चमहाभूतानि पृथिव्य तान्युत्पन्नानि । अर्थ:--हीं नामरूपे त्यापुढे आणखी व्यक्त होतां होतां त्यांचें स्थूलरूप होतें, त्यामुळे त्यांना वायुस्थिति येते, त्यापासून पुढे अग्नि, त्याच्यापासून पाणी, तेथून पृथ्वी, ह्या क्रमानें एकापासून दुसरें निघून पंचमहाभूतें, अखेर पृथ्वी, आकाराला आली. ततः पञ्चमहाभूतगुणविशिष्टा पृथ्वी । त्यामुळे पृथ्वीच्या ठिकाणीं पांचही महाभूतांचे गुण आले. पृथ्व्याच पञ्चात्मक्यो व्रीहियवाद्या ओषधयः जायंते । अर्थ :- पृथ्वीपासून त्रीहि, यव वगैरे धान्य वनस्पति निर्माण झाल्या. त्यांच्यामध्येही ते पंचमहाभूतांचे गुण उतरले. ताभ्यो भक्षिताभ्यो लोहितं शुक्रंच स्त्रीपुंसशरीरसंबन्धि जायते । अर्थ:- ती खाल्यामुळे बायका आणि पुरुष यांच्या शरीगंत रक्त व रेत उत्पन्न होतात. तदुभयकाले अविद्याप्रयुक्तकामखजनिर्मथनोतं मंत्र- संस्कृतं गर्भाशये निषिच्यते । - अर्थ:- स्त्रीच्या ऋतुकाली अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या कामवासनेनें दोघांची इच्छा झाली असतां मंत्राचा संस्कार झाल्या- वर गर्भाशयांत त्या दोन्हींचा ह्मणजे रेतरक्तांचा मिलाफ होतो. • तत्स्वयोनिरसानुप्रवेशेन विवर्धमानं गर्भीभूतं नवमे दशमे •वा मासि संजायते ॥ २० ॥ अर्थः - त्या योनिमध्ये स्त्रीच्या जननेंद्रियांतील पोषक रस