( १४ ) मिळतो आणि तो गर्भ वाढू लागतो. पुढें नवव्या किंवा दहाव्या महिन्यांत तो जन्माला येतो. तज्जातं लब्धनामाकृतिकं जातकर्मादिभिः मन्त्रसंस्कृतं पुन: उपनयनसंस्कारयोगेन ब्रह्मचारिसंज्ञं भवति । अर्थः -जन्मास येतांच त्याला नांव व आकार प्राप्त होतात. त्याचे जातकर्म वगैरे संस्कार होतात. मुंज लागली ह्मणजे तोच ब्रह्मचारी बनतो. --- तदेव वनस्थसंस्कारेण तापससंज्ञं भवति । अर्थ:- त्यालाच वानप्रस्थाची दीक्षा दिली की तो तपस्वी झाला. तदेव क्रियाविनिवृत्तिनिमित्तसंस्कारेण परित्राडू संज्ञ भवति । - अर्थ:- ह्यालाच सर्वकर्म परित्यागाचा उपदेश झाला की तो संन्यासी होतो. इत्येवं त्वत्तोभिन्नं भिन्नजात्यन्वयसंस्कारं शरीरं ॥ २१ ॥ सारांश असले हे नानाप्रकारचे संस्कार घडलेलें शरीर तुझ्याहून निराळे आहे. लक्षांत आलें ना ! मनथेंद्रियाणिच नामरूपात्मकानेव 'अन्नमयं हि सोम्य मनः ' इत्यादि श्रुतिभ्यः ॥ २२ ॥ अर्थ:-- (आतां देहापेक्षां सूक्ष्म ) मन आणि इंद्रियेंसुद्धां नाम- रूपाचाच प्रकार. ह्या ह्मणण्याला आधार श्रुति ' बेटा मन हें अन्न.. मयच आहे ' ह्मणजे भूतपदार्थरूप आहे, ते आत्मा नव्हे. कथं चाहं भिन्नजात्यन्वय संस्कारवर्जितः इत्येतच्छृणु- योऽसौ नामरूपयोर्व्याकर्ता नामरूपधर्मविलक्षणः स एव नामरूपे व्याकुर्वन् सृध्दं शरीरं स्वयं संस्कारधर्मवर्जितो
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही