भाषांतरकर्त्याची प्रस्तावना. श्रीजगद्गुरु शंकराचार्यांच्या अनेक परमार्थ ग्रंथांपैकी उपदेशसहस्री हा गद्यपद्यात्मक ग्रंथ बराच सुलभ आहे. उपनिषदांतील सार काढून भग- वंतानी गीता सांगितली त्याप्रमाणेच शंकराचार्यांनी उपनिषदें व ब्रह्मसूत्रें ह्यांचे तात्पर्य ह्या ग्रंथांत आणले आहे. सन १९०८ साली हुबळी येथे श्रीशंकराचार्याच्या उत्सवाचे प्रसंगी ह्या ग्रंथाचें सरळ मराठी भाषांतर करणारास बक्षीस लाविले होतें. त्या वेळच्या भाषांतरांचा निकाल १९०९ सालीं लागला व बक्षिसादाखल ५१ रुपये भाषांतरकर्त्यास मिळाले. हे भाषांतर पहाण्याची व वाचण्याची उत्कंठा आमच्या बऱ्याच स्नेही मंड- ळीस होती, पण ती कांहीं कारणांनी पूर्ण झाली नाही. पुढें रसिकरंजनग्रंथ- प्रसारक मंडळींनी त्या प्रकारचें भाषांतर प्रसिद्ध करण्याबद्दलचें काम अं गावर घेतलें; त्यामुळे हा प्रयत्न वाचकवर्गापुढे येत आहे. - असल्या कठिण विषयाच्या ग्रंथाचें खरें व पूर्णज्ञान तो ग्रंथ कोणा- तरी विद्वानाच्या तोंडूनच ऐकून समजून घेतल्याशिवाय मिळत नाहीं. परंतु मुळीच कांहीं न कळण्यापेक्षां कांहीं थोडीबहुत तरी समजूत ( आणि खरोखर समजूतच ती ) भाषांतरावरून होईल, म्हैसूर येथें प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांतील मूळ आधारास घेऊन हें भाषांतर केलेले आहे. टीकाकारांचें विवेचन नको असा मूळपासून उद्देश असल्यामुळे कित्येक ठिकाणी भा पांतर नीरस वाटेल हे भाषांतरकर्ता जाणून आहे. अपरिहार्य स्थलाशि- बाय इतर ठिकाणी शास्त्रीय पारिभाषिक शब्द टाळण्याचा प्रयत्न करणे येवढे शक्य होतें, त्याप्रमाणे केलेले आहे. ज्यांना मूळ संस्कृत समजतें त्यांच्याकरतां हा प्रयत्न नाहीं, पण अशा रीतिनें तरी हा ग्रंथ वाचकव र्गापुढे येण्याचा हा सुयोग आला आहे, ह्याबद्दल परमेश्वराची स्तुति आणि न्यून तें पुरते " करून घेण्याबद्दल वाचकवर्गाची विनंति करीत आहे. यांत जे कांहीं दोष असतील ते दाखविणाऱ्या गृहस्थांचा भाषांतरकर्ता फार आभारी होईल. १ 46 पुणे ता० २६ माहे जुलै १९११ भाषांतरकर्ता.
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही