पुणे येथील मोठमोठ्या विद्वान् सद्गृहस्थांच्या आश्रयाखाली स्थापन झालेली रसिकरंजन ग्रंथप्रसारक मंडळी. विद्वान्, पदवीधर, प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार वगैरे कसलेल्या रसिक व मार्मिक लोकांनी लिहिलेले-पसंत केलेले ग्रंथ या मंडळी- कडून प्रसिद्ध करण्यांत येतील, -- मंडळीचे सर्व ग्रंथ, धार्मिक, नैतिक, सामाजिक, औद्योगिक, ऐति- हासिक, शास्त्रीय व पौराणिक वगैरे विषयांस धरून ( कादंबऱ्या, नाटके, काव्, चरित्रे, निबंध वगैरे ) सर्व आबालवृद्ध स्त्रीपुरुषांस वाचण्यास योग्य असेच सोप्या आणि मनोरंजक भाषेत प्रसिद्ध होतील. आमच्या सर्व महाराष्ट्र " बंधुभगिनींनीं " या सत्कृत्यास हातभार लावून महाराष्ट्र वाङ्मयाची सेवा करण्याचें पुण्य पदरीं घेऊन आझांला उत्तरोत्तर पुढे पाऊल टाकण्यास प्रोत्साहन द्यावें अशी त्यांस सविनय विनंति आहे. - --- 4 महाराष्ट्रवाङ्मयनिधिचा प्रसार करण्याचे काम महाराष्ट्रांतील प्रत्येक स्त्रीपुरुष त्याचा अल्पांश तरी वांटेकरी आहे जबाबदार आहे हे जाणून महाराष्ट्र बंधुभगिनी-रसिकजन या सत्कृत्यास लेखनद्वारा, द्रव्यद्वारा किंवा अशाच प्रकारानें इस्तें परहस्तें मदत करतील, या आशेवर आह्मी महा- राष्ट्रवाङ्मय प्रसिद्ध करण्याचें जूं आनंदाने आपल्या खांद्यावर घेण्यास तयार झालो आहोत; त्याचें चीज करण्याचे काम सर्व महाराष्ट्रबंधुभगि- नींकडे आहे व तें उत्तम प्रकारानें शेवटास नेतील यांत कांहीं शंका नाहीं.
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही