[ २ ] रसिकरंजन ग्रंथमसारक मंडळीचे नियम. १. एक रुपया भरून मंडळीचे कायमचे वर्गणीदार होतां येतें. २. एक रुपया भरणारास कायमचा वर्गणीदार समजून त्यास मंडळी- च्या सर्व सवलतींचा फायदा देण्यांत येईल. ३. कायमचे वर्गणीदारांस मंडळीचा प्रसिद्ध होणारा प्रत्येक ग्रंथ पाऊ- णपट किंमतीस देण्यांत येईल. ४. एका वर्षात तीन किंवा चार ग्रंथ प्रसिद्ध होतील. ५. प्रत्येक ग्रंथ प्रसिद्ध होण्याचे आधी कायमचे वर्गणीदारांकडे त्या पुस्तकाचे माहितीपत्रक सूचनेदाखल पाठविण्यांत येईल. ६. प्रत्येक ग्रंथ वर्गणीदारानें घेतलाच पाहिजे अशी त्याजवर सक्ती नाहीं ७. परगांवचे वर्गणीदारांस व्ही. पी. नें ग्रंथ पाठविण्यांत येतील. ८. कोण व्ही. पी. चा स्वीकार न करितां ती परत आमचेकडे पाठ- वून दिल्यास त्या वर्गणीदाराचें नांव वर्गणीदारांचे पटांतून काढून टाक ण्यांत येईल, व त्यास मंडळीच्या कोणत्याहि सवलतींचा फायदा मिळू शकणार नाहीं, व रुपया परत मिळणार नाहीं. ९. ज्या गांवीं आमचे एजंट आहेत तेथील ग्रंथ मिळण्याची व्यवस्था करण्यांत येईल. वर्गणीदारांस एजंटमाफत १०. आमची मुंबईची सोल एजन्सी हिन्द एजन्सीकडे आहे. मुंबई संबंधानें हरएक पत्रव्यवहार त्यांजकडे करावा. ११. गांवोगांवीं एजंट पाहिजेत. एजन्सीचे नियम समक्ष अगर पत्रद्वारें. मुंबई, सोल एजंट हिंद एजन्सी, माधवबाग. म्यानेजर, रसिकरंजन ग्रंथप्रसारक मंडळी, सदाशिव पेठ, घ. नं. ४४४, पुणे-सिटी.
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही