पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. ८९ चतुर्थोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । इमं विवस्वते योग प्रोक्तवानहमव्ययम् । [कामरूपी आसक्ति सोडून लोकसंग्रहार्थ सर्व कमैं स्वधमाप्रमाणे करण्याला इंद्रिये ताब्यांत पाहिजेत, व तेवढाच इंद्रियनिग्रह येथें विव- क्षित आहे. इंद्रियेच जबरीने अजीबात मारून सर्व कम सोड असा अर्थ नाहीं (गीतार. प्र. ५ पृ. ११३ पहा). "इंद्रियाणि पराण्याहुः०" इत्यादि ४२ वा श्लोक कठोपनिषदांतला असून त्याच उपनि- षदांतून दुसरोहि चारपांच श्लोक गीतेत घेतलेले आहेत हे गीता- रहस्यांत (परि. पृ. ५२२) दाखविले आहे. इंद्रियांचं काम बाह्य पदार्थाचे संस्कार ग्रहण करण्याचे असून मनाने त्याची व्यवस्था लाविल्यावर बुद्धि त्याची निवडानिवड करते आणि आत्मा यापलीकडचा व या सर्वाहन भिन्न आहे, हे क्षत्रक्षेत्रज्ञविचाराचे तात्पर्य असून, याबद्दल सविस्तर विचार गीतारहस्याच्या सहाव्या प्रकरणाचे अखेर (पृ. १३१-५४६) केला आहे तो पहा. मनुष्याची इच्छा नसताहि कामक्रोधादि प्रवृत्तिधामुळे तो एखादे कर्म करण्यास कसा प्रवृत्त होतो, आणि आत्मस्वातंत्र्यामुळे इंद्रियनिग्रहरूप साधनाने यांतूनहि सटका होण्याचा मार्ग कसा सांपडतो, इत्यादि कर्मविपाकांतील गूढ प्रश्नांचा विचार गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत (पृ. २७४- २८२) केला असल्यामुळे, येथे त्याची विरुक्ति करून जागा अडवीत नाही. इंद्रियनिग्रह कसा करावा याचा विचार पुढे गीतेच्या सहाव्या अध्या- यांत केलेला आहे.] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाईलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत अाविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील कर्मयोग नांवाचा तिसरा अध्याय समाप्त झाला.