पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ श्रीमद्भगवद्गीता. अर्जुन उवाच । $$ अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः। वर्णन संपल्यावर, ब्रह्मदेवाच्या सातव्या म्हणजे प्रस्तुतच्या जन्मांतले कृतयुग समाप्त होऊन--- त्रेतायुगादौ च ततो विवस्वान् मनवे ददौ । मनुश्च लोकभृत्य) सुतायेक्ष्वाकचे ददा ॥ इक्ष्वाकुणा च कथितो व्याप्य लोकानवस्थितः । गमिप्यति क्षयांते च पुनारायणं नृप । यतनिां चापि यो धर्मः स ते पूर्व नृपत्तिम । कथितो हरिगीतासु समासविधिकल्पितः ॥ " त्रेतायुगारंभी विवस्वानाने मनूस (हा धर्म) दिला, मनूने लोकधा- रणार्थ तो आपल्या पुत्रास म्हणजे इक्ष्वाकूस दिला; आणि इक्ष्वाकू- पासून पुढे सर्व लोकांत प्रसृत झाला. हे राजा ! सृष्टीचा क्षय झाला म्हणजे (हा धर्म) पुनः नारायणाकडे जाईल. हा धर्म आणि 'यतीनां चापि' म्हणजे त्याबरोबरच संन्यासधर्महि तुला पूर्वी भगवी तेत वर्णिला आहे," असें नारायणीय धर्मातच पुनः वैशंपायानाने जनमे, जयास सांगितले आहे (म. भा. शां. ३४८. ५१-५३). यावरून ज्या द्वापर युगाचे अखेरीस भारती युद्ध झाले त्याच्या पूर्वीच्या त्रेतायुगा- पुरतीच भागवत धर्माची परंपरा वर्णिली आहे, विस्तारभयास्तव जास्त वर्णन केलेले नाही, असे दिसून यतें. हा भागवतधर्म म्हणजेच योग किंवा कर्मयोग होय. आणि मनला कर्मयोगाचा उपदेश केल्याची ही कथा गीततच आली आहे असं नाही. तर भागवतपुराणांत (भाग... २४.५५) या कथेचा उल्लेख असून मत्स्यपुराणाच्या ५२ व्या अध्यायांत मनूस अपदेशिलेल्या कर्मयोगाचे महत्वही वर्णिले आहे. पण यांपैकी कोणतीच माहिती नारायणीयोपाख्यानांतील माहिती इतकी पूर्ण नाही. - - - - - - - - - - - - - - -