पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. ९६ कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ।। ४॥ विवस्वान-नु-इक्ष्वाकु ही परंपरा सांख्यमार्गास बिलकूल लागू होत नाही; आणि सांख्य व योग या दोहोखराज तिसरी निष्ठा गीतेत वर्णिलेली नाही, हे लक्षात आणिले म्हणजे कर्मयोगाचीचं ही परंपरा आहे, असे दुसऱ्या रीतीनेहि सिद्ध होते (गी. २.३९). परंतु सांख्य व योग या दोन निघांची परंपरा जरी एक नसली तरी कर्मयोगाच्या म्हणजे भागवतधर्माच्या निरूपणांतच सांख्य किंवा संन्यास निष्टेच्या निरूपणाचा पर्यायाने समावेश होत असल्यामुळे (गीतार. प्र. १४ पृ. ४६५ पहा ) भगववीतेत यतिधर्म म्हणजे संन्यासधर्महि वर्णिला आहे असे वैशंपायनाने म्हटले आहे. मनुस्मृतति चार आश्रमधर्माचे जे वर्णन आहे त्यांत अखेर ६ व्या अध्यायांत प्रथम पतीचा म्हणजे संन्यासाश्र- माचा धर्म सांगितल्यावरून त्याचा विकल्प या नात्याने "वेदसंन्या- सिकांचा कर्मयोग" या नांवाने गीतेतील किंवा भागवतधर्मातील कर्मयोगाचे वर्णन असन " नि:स्पृहपणान स्वकार्य करीत रहाण्यानेच शेवटी परम सिद्धि मिळते." असे स्पष्ट म्हटले आहे (मनु. ६.९६);व त्यावरून कर्मयोग मनूसाह ग्राह्य होता असे उघड देसून येते. त्याच- प्रमाण इतर स्मृतिकारसहि हा मान्य होता याबद्दलची प्रमाणे गीता- रहस्याच्या ११ व्या प्रकरणाच्या अखेर (पृ. ३६०-३६३) दिली आहेत. अर्जुनाची या परंपरेवर आतां शंका आहे की- _अर्जुन म्हणाल-(४) तुमचा जन्म अलीकडचा व विवस्वानाचा पलीकडचा म्हणजे तत्पूर्वीचा; (असे असतां) तुम्हीं (हा योग) आदी सांगितलात भी कसे ओळखावे? [अर्जुनाच्या या प्रश्नास उत्तर देतांना, भगवान् आपली अवतार कृत्य वर्णन करून " मीहि याप्रमाणे कम करीत आलो आहे" असें आसक्ति- विरहित कर्मयोगाचे किंवा भागवतधर्माचेच आतां पुनः समर्थन करितात-