पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०. - - - - - - -- - - - - - - - श्रीमद्भगवद्गीता. कर्मणो ह्याप बोद्धव्यं बोधव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥

व ते दोन्हीहि या ठिकाणी विवक्षित नसतील असे म्हणता येत नाही.

तथापि पुढील श्लोकांत 'विकर्म ' म्हणून कर्माचा तिसरा एक भेद केला असल्यामुळे, या श्लोकांत अकर्म शब्दाने संन्यासमार्गीय लोक ज्याला कर्माचा स्वरूपतः त्याग' असे म्हणतात तो कर्मत्याग विशेषेकरून उद्दिष्ट आहे. किंबहुना संन्यासमार्गीय लोक म्हणतात त्याप्रमाणे कर्माचा सर्वस्वी स्याग करण्याची जरूर नाही, अशा प्रकारचा कर्मत्याग खेर 'अकर्म' नसून त्यांतील बीज निराळेच आहे, हे दाखविण्यासाठी प्रस्तुत विवेचन केले आहे, असे पुढल्या म्हणजे १८ व्या श्लोकावरील टीपेवरून दिसून येईल.] . (१७) कर्माची गति गहन आहे; (म्हणून) कर्म म्हणजे काय इंहि जाणिले पाहिजे, व विकर्म (विपरीत कम) म्हणजे काय हे समजले पाहिजे आणि अकम (कर्म न करणे) म्हणजे काय हेहि कळावयास पाहिजे. (१८) कर्माचे ठायीं अकर्म आणि अकर्माचे ठायौं कर्म ज्याचे नजरेस येते तो पुरुष सर्व मनुष्यांत ज्ञानी, आणि तोच युक्त ह्मणजे योगयुक्त व सर्व कर्म करणारा होय. । [या व पुढील पांच श्लोकांत कर्म, अकर्म व विकर्म यांचा खुलासा केलेला असून यांत जे काही उणे आहे ते पुढे अठराव्या अध्यायांत कर्मत्याग, कर्म आणि कर्ता यांच्या विविध भेदांचे जे वर्णन केले आहे स्यांत भरून काढिले आहे. (गी. १८.४-७; २३-२५, १८.२६-२८). दोन्ही ठिकाणच्या या कर्मकर्मविवेचनावरून कर्माविकर्मासंबंधाने गौतेचे काय सिद्धान्त आहेत ते येथे थोडक्यांत स्पष्टपणे सांगणे जरूर आहे.. कारण टीकाकारांनी याबद्दल फारच छोटाळा केलेला आहे. सन्यास- मार्गीयांस सर्व कर्माचा स्वरूपतः त्याग इष्ट, महणून ते गीताल