पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - - - - - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः। अकर्म' पदाचा अर्थ ओढाताणीने आपल्या मार्गाकडे आणण्यास पहा- तात; आणि मीमांसकांस यज्ञयागादि काम्य कर्म इष्ट असून त्याखेरीज इतर सर्व — विकर्म' वाटत असते. शिवाय मीमांसकांचे नित्यनैमित्तिकादि कर्मभेदहि त्यांतच येतात, व धर्मशास्त्री पुनः स्यांतच आपले घोडे ढकलू पहात असतात. सारांश, चाहोंकडून अशी अढाताण झाल्यामुळे गीता अकर्म'कशाला ह्मणस्ये आणि 'विकर्म' कशाला ह्मणये हैं अखेर कळेनासे होते. ह्मणून पहिल्याने ही गोष्ट लक्षात ठविली पाहिजे की गीतेत ज्या तारिवक दृष्टीने या प्रश्नाचा विचार केला आहे ती दृष्टि निष्काम कर्मे करणान्या कर्मयोग्याची आहे, काम्य कर्मे करणा-या मीमांसकांची नव्हे किंवा कमै सोडणाच्या संन्यासमार्गीयांचीहि नव्हे. गीतेची ही दृष्टि स्वीकारिली ह्मणजे 'कर्मशून्यना' या अर्थी अकर्म' या जगांत कोठेच असणे शक्य नाही, किंवा कोणीहि मनुष्य कधीही कर्मशून्य असू शकत नाही, असें प्रथमतः प्राप्त होते. (गी. ३.५, १८.११). कारण निजणे, बसणे, निदानमक्षी जिवंत रहाणे तरी कोणा- लाच सुटत नाही. आणि कर्मशून्य होणे तर शक्य नाही, तर अकर्म कशाला ह्मणावयाचे हे ठरवावे लागते. गीतेचे याला असे उत्तर आहे की, कर्म म्हणजे नुस्ती क्रिया असें न समजता त्यापासून पुढे शुभा- शुभादि जे परिणाम उत्पन्न होतात त्यांचा विचार करून कर्माचे कर्मत्व वा अकर्मत्व ठरवा. सृष्टी म्हणजेच जर कर्म, तर मनुष्य जापर्यंत सृष्टीत आहे तोपर्यंत त्याला कम चुकत नाही म्हणून काकांचा जो विचार करावयाचा तो मनुष्याला ते कर्म कितपत बाधेल एवम्याच दृष्टीने केला पाहिजे. जें कर्म करूनही आपल्याला बाधत नाही त्याचे कर्मत्व म्हणजे बंधत्व गेले अबेंच म्हटले पाहिजे आणि कोणत्याह कर्माचे बंधकरव अर्थात कर्मत्व जर याप्रमाणे नाहीसे झाले तर ते कर्म - - - - - - - - --