पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥ अकर्मच झाले. अकर्म म्हणजे कर्मशून्यता असा लौकिकांत अर्थ आहे खरा; पण शास्त्रीयदृष्टया विचार करता तो येथें जुळत नाही. कारण स्वस्थ बसणे म्हणजे कर्म न करणहि कित्येकदा कर्मच होते, असे आपल्या नजरेस येते. उदाहरणार्थ, आपल्या आईबापांस कोणी मारहाण करीत असता त्यांचे निवारण न करितां स्वस्थ बसणे, हे तरकाली लौकिकदृष्टया अकर्म म्हणजे कर्मशन्याब असले तरी ते कर्मच,किंब- हना विकर्म-असून कर्मविपाकदृष्ट्या त्याचे अशुभ परिणाम आप- ल्याला भोगावे लागल्याखेरीज रहात नाहीत. म्हणून गीता या श्लोकांत विरोधभासरीत्या मोठ्या खुबीने असे सांगत आहे की, अक- मर्माच्या ठिकाणी सुद्रा (कधी कधी भयंकरहि) कर्म होते, आणि कर्म करूनहि ते कर्मविपाकदृष्टया मेल्यासारखें म्हणजे अकर्म होते, हे ज्याने ओळखिलें तो ज्ञानी होय; व हाच अर्थ पुढील श्लोकांत निरनिराळ्या प्रकारे वर्णिला आहे. कर्माच्या फलाचे बंधन न लागण्यास ते कर्म नि:- संगबुद्धीने म्हणजे फलाशा सोडून निष्काम खुद्रीने करणे एवढे एकच गीताशास्त्राप्रमाणे खरे साधन आहे. (गीतारहस्य प्र. ५ पृ. १०९- ११ .१० पृ. २८२ पहा). म्हणून या साधनाचा उपयोग करून म्हणजे निःसंगबुद्धीने जे कर्म केले तेच गीतेप्रमाणे प्रशस्त म्हणजे साविक कर्म असून (गी. १८.५), गीतेप्रमाणे तेच खरे ' अकर्म' होय, कारण त्याचे कर्मस्व म्हणजे कर्मविपाकप्रक्रियेप्रमाणे बंधकरव गेलेले असते. मनुष्ये जे काही करितात (आणि 'करितात' या पदांत स्वस्थ बसण्याचाहि समावेश करावयाचा) स्यांतून वरील प्रकारचा म्हणजे 'सात्विक कमें,' किंवा गीतप्रमाण 'अक' वजा केली म्हणजे बाकी जी कमें शिल्लक राहतात त्यांचे दोन वर्ग होऊ शकतात; एक राजस व दसरा तामस, पैकी तामस में मोहान व अज्ञानाने होत असतात: म्हणून ती विकम या सदरांतच यावयाची. मग मोहाने कर्म सोडिले