पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । शब्दादीन्विषयानन्य इंद्रियाग्निषु जुहति ॥ २६ ॥ सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे। आत्मसंयमयोगानौ जुद्वति शानदीपिते ॥ २७॥ (२६) दुसरे कोणी श्रोग्रादि (कान, डोळे इत्यादि) इंद्रियांचा संयमरूप अग्नीत होम करितात आणि काही इंद्रीयरूप अग्नीत (इंद्रीयांच्या) शब्दादि विषयांचा होम करितात. (२७) दुसरे काही लोक इंद्रियांची व प्राणांची सर्व कर्मे म्ह० व्यापार ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयमनरूप योगाच्या अग्नीत हवन करीत असतात. [दोनतीन प्रकारचे लाक्षणिक यज्ञ वरील श्लोकांत वर्णिले आहेत. (१) इंद्रियांचे संयमन करणे म्हणजे त्यांस योग्य मर्यादेच्या आंत आपआपले व्यवहार करूं देणे; (२) इंद्रियांचे विषय म्हणजे उपभोग्य पदार्थ सर्वस्वी सोडून देऊन, इंद्रिये अजीबात मारून टाकणे; (३) इंद्रियांचेच नव्हे, तर प्राणाचेहि व्यापार बंद ठेवून म्हणजे पुरी समाधी लावून केवळ आत्मानंदांतच गढून रहाणे. आतां यज्ञाची उपमा यांस लागू केली म्हणजे पहिल्या प्रकारांत इंद्रियांस घालून दिलेलो मर्यादा (संयमन) हा अग्नी झाला. कारण दृष्टान्ताने या मर्या- देच्या में आंत आले त्याचं त्यांत हवन केले असें म्हणता येते, दुसन्या प्रकारांत याचप्रमाणे साक्षात् इंद्रिये आणि तिसन्यांत इंद्रिये व प्राण मिळून दोन्ही होम करावयाची द्रव्ये होऊन आत्मसंयमन हा अग्नी होतो. याखेरीज नुसता प्राणायाम करणारे कित्येक असतात; व त्यांचे वर्णन पुढे २९ व्या श्लोकांत आहे. 'यज्ञ' शब्दाचा द्रव्यात्मक यज्ञ हा मूळचा अर्थ लक्षणेनें विस्तृत ब व्यापक करून सप, संन्यास, समाधी, प्राणायाम वगरे भगवरप्राप्तीच्या सर्व प्रकारच्या साधनांचा 'यज्ञ' या एका सदरांतच समावेश करण्याची ही कल्पना भगवद्गीतेतच - - - - -- --