पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

16 श्रीमद्भगवद्गीता. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाईलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील ज्ञानकर्मसंन्यासयोग नांवाचा चवथा अध्याय समाप्त झाला. । ['ज्ञानकर्मसंन्यास' या पदांत 'संन्यास' शब्दाचा अर्थ स्वरूपतः कर्मत्याग' नसून निष्काम बुद्धीने परमेश्वराचे ठायीं कर्माचा संन्यास म्हणजे अर्पण' करणे असा अर्थ आहे हे लक्षात ठविले पाहिजे; व तोच खुलासा पुढे १८ व्या अध्यायाचे आरंभी केला आहे. ] पंचमोऽध्यायः । अर्जुन उवाच । संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे हि सुनिश्चितम् ॥ १ ॥ श्रीभगवानुवाच । संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । अध्याय पांचवा. [चवथ्या अध्यायांतील सिद्धान्तावर संन्यासमार्गीय लोकांची जी शंका येण्याचा संभव आहे तीच अर्जुनाचे मुखांतून प्रभरूपाने वदवून तिचे स्पष्ट उत्तर या अध्यायांत भगवंतांनी दिले आहे. ज्ञान हे सर्व कर्माचे पर्यवसान नसून (१.३३) ज्ञानानेच जर सर्व कर्मे भस्म होतात (१.३७)व द्रव्यमय यशापेक्षां ज्ञानमय यज्ञच जर श्रेष्ठ (४.४३), तर दुसऱ्याच अध्या-