पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५. १२५ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमानोति नैष्ठिकीम् । अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ १२॥ सर्वकर्माणि मनसा सन्यास्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥ 55 न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः । न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥ नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः। अमानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः ॥१५॥ (१२) जो युक्त म्हणजे यागयुक्त झाला तो कर्मफल सोडून देऊन अखेरची पूर्ण शान्ति मिळवितो; आणि अयुक्त म्हणजे जो योगयुक्त नाही तो कामाच्या म्हणजे वासनेच्या योगाने फलाच्या ठायीं सक्त होऊन (पापपुण्याने) बांधला जातो. (१३) सर्व कर्माचा मनाने (साक्षात् नव्हे) संन्यास करून, जितेंद्रिय देहवान् (पुरुष) नऊ द्वारांच्या या (देहरूपी) नगरांत कांहीं न करितां व न करविता आनंदाने पडला रहातो. म्हणजे आत्मा हा अकर्ता असून सर्व खेळ प्रकृतीचा आहे हे तो जाणतो, आणि त्यामुळे स्वस्थ किंवा उदासीन पडला रहातो (गीता १३. २० व १८. ५९ पहा ). दोन डोले, दोन कान नाकपुड्या, तोंड, मूत्रंद्रिय व गुद ही शरीराची नऊ द्वारे किंवा दरवाजे समजतात. असो कर्मयोगी कर्मे करूनहि युक्त कसा रहातो याची अध्यात्मदृष्टया हीच उपपत्ति सांगतात- (१४) प्रभु म्हणजे आत्मा किंवा परमेश्वर लोकांचे कर्तत्व, त्याची कम, (किंवा त्यांना प्राप्त होणारी) कर्मफलाची जोडहि निर्माण करीत 'नाही. स्वभाव म्ह० प्रकृतिध (सर्व काही ) करीत असते. (१५) विभुम्ह. सर्वव्यापी आत्मा किंवा परमेश्वर कोणाचे पाय व कोणाचे पुण्यहि घेत नाही.