पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते । निष्पन्न होतो. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।" (गी. ५-१२)-योगी कर्मफलाचा त्याग करून पूर्ण शान्ति मिळवितो अध्यायांत वचन आहे, त्यावरूनहि हाच अर्थ सिद्ध होतो. कारण त्यांत शान्तीचा संबंध कर्मत्यागाशी न जोदितां फक्त फलाशा- स्यागाशीच वर्णिला असून, तेथेंच योग्याने जो कर्मसंन्यास करावयाचा तो 'मनसा' म्हणजे मनाने करावयाचा (गी. ५.१३), शरीराने किंवा केवळ इंद्रियद्वारा त्याने कमें केलीच पाहिजेत, असे स्पष्ट म्हटले आहे. आमचे तर असे मत आहे की, अलंकारशास्त्रांत ज्याला अन्योन्यालंकार म्हणतात, तशा प्रकारची अर्थचमत्कृति किंवा सौरस्य प्रस्तुतच्या श्लोकांत साधले असून, पूर्वार्धात 'कर्म' हे ' शमाचे' केव्ही कारण होते ते सांगितल्यावर, उलटपक्षी ' शम' हे कर्माचे' केव्हां कारण होते, याचे उत्तरार्धात वर्णन केले आहे. भगवान् असे सांगतात की, प्रथम साधनावस्थेत 'क'च शमाचे म्हणजे योगसिद्धीचे कारण होते. म्हणजे यथाशक्ति निष्काम को कारतां करितांच चित्त शान्त होऊन तद्वारा अखेर पूर्ण योगसिद्रि होते. पण योगी योगारूढ होऊन सिद्धावस्थेस पोंचला म्हणजे कर्भ व शम यांचा हा कार्यकारणभाव बदलून कर्म शमाचे कारण न होता, शमच कर्माचे कारण बनतें; म्हणजे योगारूत आपली सर्व. कम आतां कर्तव्य म्हणून फलाशा न टेषितां शान्त चित्ताने करीत असतो. सारांश सिद्धावस्थेत कमैं सटतात असा या श्लोकाचा भावार्थ नसून, 'कर्म' आणि 'शम यांच्या- मधील साधनास्थेंतला कार्यकारणभाव मात्र सिद्धावस्थेत बदलतो, असें गीतेचे सांगणे आहे (गीतारहस्य प्रकरण ११ पू. ३२२, ३२३ पहा). कर्मयोग्याने अखेर कमैं सोहिली पाहिजेत असे गीतेत कोहि सांगितले नाही, तसें सांगण्याचा उद्देशहि नाही. म्हणून संधि