पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ श्रीमद्भगवद्गीता. युजन्नेवं सदाऽऽत्मानं योगी नियतमानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ।। १५॥ करून, चित्त माझ्याच ठिकाणी लावून मत्परायण होस्साता युक्त होऊन बसावें. । 'शुद्ध जागी' व 'शरीर, मान व डोके सम करून' हे शब्द श्वेताश्वतरोपनिषदांतील आहेत (श्वे. २.८ व १० पहा); आणि वरील एकंदर वर्णनहि हठयोगांतील नसून जुन्या उपनिषदांतील योगाच्या वर्णनांशी अधिक जुळते आहे. हठयोगांत इंद्रियाचा निग्रह वलात्काराने करीत असतात; पण तसे न करितां “मनसैव इंद्रियग्रामं विनियम्य" -मनानेच इंद्रिये आंवरावी असे याच अध्यायांत पुढे २४ व्या श्लोकांत हटले आहे. यावरून हठयोग गीतेत विवक्षित नाही हे उघड होते. तसेंच जन्मच्या जन्म योगाभ्यासांत घालवावा असा या वर्णनाचा हेतु नाही याच अध्यायांत शेवटी सांगितले आहे. सध्या याच योगाभ्या- साचें फल जास्त निरूपण करितात- (१५) याप्रमाणे सदा आपला योगाभ्यास चालू ठविल्याने मन ताब्यांत येऊन (कर्म-) योग्यास माझ्या ठायी असणारी व शेवटीं निर्वाणप्रद झणजे माझ्या स्वरूपांत लय करवून देणारी शान्ति प्राप्त होत्ये. या श्लोकांत 'सदा' या पदाने दररोज २४ तास असा अर्थ घ्याव- याचा नाही. रोज घटका घटका यथाशक्ति हा अभ्यास करावा एवढाच अर्थ विवक्षित आहे (श्लोक १० वरील टीका पहा). याप्रमाणे योगा- भ्यास करीत असतां 'मच्चित्त' व 'मत्परायण' हो, असे म्हटले आहे याचे कारण असे की, पातंजल योग झणजे मनाचा विरोध कर- ण्याची एक युक्ति किंवा क्रिया होय. या कसरतीने मन ताब्यात आले तरी ते एकाग्र मन भगवंताचे ठायीं न लावितां दुसऱ्या गोष्टीकडेहि लाविता येईल. पण एकाग्रचित्ताचा असा दुरुपयोग न करितां, मनाची