पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. FF यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सर्वकामेभ्यों युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥ यथा दीपो निवातस्थो नेगते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः ॥ १९ ॥ वयाचा हैं उघड होते. आतां योग्याचे थोडे वर्णन करून नंतर समाधि सुखाचे स्वरूर सांगतात--] (10) आंवरून धरिलेले मन जेव्हां आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर होते, आणि कोणत्याहि उपभोगाची इच्छा रहात नाही, तेव्हा तो युक्त झाला असे म्हणतात. (१९) निवांत जागी ठेविलेला दिवा म्हणजे दिव्याची ज्योत जशी निश्चल रहात्ये तीच उपमा चित्त आंवरून आपला योगाभ्यास करणाच्या योग्यास दिलेली आहे. [या उपमेशिवाय महाभारतांत (शान्ति. ३००३१,३४)"तेलाने भरलेले पात्र जिन्यावरून नेतांना, किंवा वादळांत नावेधा बचाव कारतांना मनुष्य जसा 'युक्त' किंवा एफान होतो तसे योग्या मन एकाम होत असते" असे दृष्टांत आले आहेत. सारथी व रथाचे घोडे हा कठोपनिषदांतील दृष्टान्त तर प्रसिद्धच आहे व गीतेत स्पष्ट आला नाही तरी दुसन्या अन्यायांतील ६७ च ६८ आणि याच अध्यायांतील २५ वा हे श्लोक तो दृष्टांत मनांत ठेवून सांतितले आहेत. योग झणजे कर्मयोग असा जरी गीतेतला पारिभाषिक अर्थ असला, तरी त्या शब्दाचे इतर अर्थहि गीतेत आले आहेत. उदाहरणार्थ, ९.५ व१०.७ या श्लोकांत योग म्हणजे "अलौकिक किंवा वाटेल तें करण्याची शक्ति" असा अर्थ आहे. किंबहुना योग शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळेच गीतेत पातंजल योग किंवा सांख्यमार्ग प्रतिपाद्य आहे असे म्हणण्यास त्या त्या संप्रदायांतील लोकांस सवड झाली आहे असे म्हटले तरी चालेल. असो; १९ या श्लोकात सांगि. तलेल्या चित्तनिरोधरूपी पातंजल योगांतील समाधीचंच स्वरूप आतां विस्ताराने सांगतात--]] - - - - - -