पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. ५१ - - - - - - - - - - - - भर्जुन उवाच । FF अयतिः श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः । ताब्यांत नाही त्याला ( हा साम्यबुद्धिरूप) योग प्राप्त होणे कठिण असें माझं मत आहे; पण अंतःकरण ताब्यांत आणून प्रयत्न करीत गेल्यास उपायाने (हा योग) प्राप्त होणे शक्य आहे. [तात्पर्य, प्रथम जे दुर्घट दिसते तेच संवयीने आणि दधिोद्योगाने अखेर सिद्ध होते. 'अभ्यास' म्हणजे कोणतीहि गोष्ट पुनः पुनः करणे, आणि वैराग्य' म्हणजे राग किंवा प्रीति नसणे, अर्थात् निरिन्छपणा. पातंजल योगसूत्रांत आरंभीच " योगश्चित्तवृत्तिनिरोधः "-चित्तवृत्तीचा निशेध करणे याचे नांव योग-असे योगाचे लक्षण देऊन (याच अध्या. यांतील २० पहा ) पुढील सूत्रांत " अभ्यासवैराग्याभ्यां तनिरोधः"- अभ्यास व वैराग्य यांनी चित्तवृत्तीचा निरोध होतो असे म्हटले आहे. गीतेत हे शब्द आले असून अभिप्रायहि तोच आहे; पण तेवढ्यावरून गीतेंत हे शब्द पातंजल सूत्रांतून घेतले आहेत असें मात्र म्हणता येत नाही (गीतार. पृ. ५२६ पहा ). मनोनिग्रह करून समाधि लावणे जरी याप्रमाणे शक्य असले आणि काही निग्रही पुरु- षांना ही सिद्धि सहा महिन्यांच्या अभ्यासाने जरी प्राप्त होण्यासारखी असली, तरी यार आता दुसरी अशी शंका येते की, प्रकृतिस्वभावा- मुळे कर्मयोगाची ही परमावस्था अनेक लोकांस एकदोन जन्मांतहि साध्य होणे शक्य नसते. अशा लोकांनी ही सिदि कशी मिळवावी? कारण एका जन्मांत शक्य तेवढा इंद्रियनिग्रहाचा अभ्यास करून कर्म- योग आचरूं लागले तरी मरणसमयीं तो अपूर्णच रहाण र, आणि पुढच्या जन्मींहि पुनः पहिल्यापासून सुरवात करावयाची म्हटली म्हणजे पुनः पुढच्या जन्मीहि तोच प्रकार घडून यावयाचा. सबब अशा प्रका- रच्या पुरुषांनी काय करावे असा अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे--] - - -