पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच । धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः। मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥ अध्याय पहिला. [ भारती युद्धारंभी श्रीकृष्णांनी अर्जुनास जी गीता उपदेशिली तिचा लोकांत पुढे कसा प्रसार झाला याची परंपरा हहींच्या महाभारतां- तच अशी वणिली आहे की, युद्धारंभी व्यास इतराष्ट्राकडे जाऊन "युद्ध पहाण्याची तुझी इच्छा असल्यास मी तुला दृष्टि देतो, " असे त्यास म्हणाले. परंतु आपल्या कुलाचा क्षय पहाण्यास आपण चहात नाही असें धृतराष्ट्राने सांगितले. तेव्हां संजय नांवाच्या सुतास बसल्या जागीच प्रत्यक्ष सर्व ज्ञान व्हावे अशी दिव्यदृष्टि देऊन, व त्याने धृतराष्ट्रास युद्धाची हकीकत सांगावी अशी व्यवस्था करून, व्यास निघून गेले (म.भा, भीष्म. २). या व्यवस्थेप्रमाणे पुढे युद्भांत भीष्म पडल्यावर ती बातमी धृत. राष्ट्रास सांगण्यास प्रथम संजय त्याजकडे गेला, तेव्हां भीष्माबद्दल शोक करून युद्धाची सर्व हकीकत सांगण्यास इतराष्ट्राने संजयास आज्ञा केली. संजयाने प्रथम उभय पक्षांकडील सैन्यांचे वर्णन करून नंतर धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून गीता सांगण्यास सुरुवात केली आहे. हीच हकीकत पुढे व्या सांनी आपल्या शिष्यांस, नंतर त्या शिष्यांपैकी वैशंपायनाने जनमेजयास व अखेर सौतीने शौनकास सांगितली असून महाभारताच्या सर्व छापील