पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा- अध्याय ७. भिन्न आहेत; यासाठी त्यांची सर्वस्वी एकवाक्यता करणे युक्त नव्हे. असो; कर्मयोगांतील साम्यबुद्धि संपादन करण्यास जी साधने लाग- तात त्यांपकी पातंजल योगांतील साधनांच या अध्यायांत निरूपण केले. ज्ञान व भक्ति ही दुसरी साधने होत व पुढील अध्यायापासून त्यांच्या निरूपणास सुरुवात होईल. } याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या ह्मणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-हाणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील ध्यानयोग नांवाचा सहावा अध्याय समाप्त झाला. सप्तमोऽध्यायः । अध्याय सातवा. [कर्मयोग सांख्यमार्गाइतकाच मोक्षपद, पण स्वतंत्र व स्याहून श्रेष्ट आहे, आणि या मार्गाचे स्वल्काचरण जरी घडले तरी ते फुकट जात नाही, असे प्रतिपादन करून, या मार्गाच्या सिद्धयर्थ लागणारा इंद्रिय. निग्रह कोणत्या प्रकारे करावा याचे निरूपण करण्यांत आले. पण इंद्रिया निग्रह म्हणजे केवळ बाह्य क्रिया असुन ज्यासाठी इंद्रियांची ही कसरत करावयाची त्याचा विचार अद्याप झाला माहीं. कामक्रोधादिक शन्नु इंद्रियांचे ठायी ठाणे देऊन ज्ञानविज्ञानाचा नाश करितात " (३. ४०, ४१), म्हणून प्रथम तूं इंद्रियनिग्रह करून या अणूंना ठार कर, असे भगवंतांनीच इंद्रियनिग्रहाचे प्रयोजन तिसच्याच अध्यायांत अर्जुभास सांगितले आहे. आणि मागच्या अध्यायांतहि इंद्रियनिग्रह करून "ज्ञान विज्ञानाने तृम झालेला" (६.८), योमयुक्त पुरुष “परमे. श्वर सर्व भूतांत आणि भूत परमेश्वरांव पहातो (६.२९), असे त्याचे वर्णन केले आहे. ह्मणून इंद्रियनिग्रह कसा करावा हे सांगितल्यावर