पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ रसोऽहमप्सु कौंतेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । हे धनंजया ! दुसरे काहीहि नाही. दोन्यांत अनेक मणि ओवावे त्याप्रमाणे माझ्या ठायीं हैं सर्व ओवलेले आहे. । [या चार श्लोकांमध्ये सर्व क्षराक्षरज्ञानाचे सार आले आहे; व याचाच विस्तार पुढील श्लोकांतून केला आहे. सांख्यशास्त्रांत अचेतन म्हणजे जड प्रकृति आणि सचेतन पुरुष अशी सर्व सृष्टीची दोन स्वतंत्र तत्वे सांगून, या दोन तत्वांपासून पुढे सर्व पदार्थ उत्पन्न झाले, या दोहोंपलीकडे तिसरे तत्त्व नाही, असे प्रतिपादन केले आहे. पण गीतस है द्वैत कबूल नसल्यामुळे, एकाच परमेश्वराच्या प्रकृति व पुरुष या दोन विभूति मानून त्यांत जडप्रकृति ही कनिष्ठ पायरीची आणि जीव झणजे पुरुष ही श्रेष्ठ पायरीची विभूती होय असे ४ व ५ व्या श्लोकांत वर्णन असून या दोहोंपासून सर्व स्थावर जंगम सृष्टि उत्पन्न होत्ये असे झटले आहे (गी. १३. २६ पहा). पैकी जीवभूत श्रेष्ठ प्रकृतीचा सविस्तरविचार क्षेत्रज्ञ या दृष्टीने पुढे १३ व्या अध्ययांत केला आहे. बाकी राहिली जाप्रकृति. ही स्वतंत्र नसून परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली हिच्यापासून सर्व सृष्टि निर्माण होते, असा गीतेचा सिद्धान्त आहे (गी. ९.१० पहा), तथापि प्रकृति गीतेत जरी स्वतंत्र मानलेली नाही तरी सांख्यशास्त्रांत प्रकृतीचे जे भेद आहेत तेच थोड्याशा फरकाने गीतेत ग्राम धरिले. आहेत (गीतार, प्र. ८ पृ. १७४-१४०); आणि परमेश्वरापासून मायेने जडप्रकृति सत्पन्न झाल्यावर (गी. ७. १४) प्रकृतीपासून पुढे सर्व पदार्थ कसे निर्माण झाले याचे सांख्यांनी केलेले प्रतिपादन झणजे गुणोत्कर्षाचे तत्वाह गीतेस मान्य आहे. (गीतार प्र. ९ पृ. २४० पहा). प्रकृति व पुरुष मिळून एकंदर पंचवीस तत्वे आहेत असें सांख्य म्हणतात. पैकी प्रकृतपिासून पुढे तेवीस तवं निपजतात. या तेविसां- - - - - - - - - - - --